Latest Pune News 
पुणे

Pune Accident: रात्रीच्या सुमारास पुण्यात रिक्षाचा भीषण अपघात, मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू तर मुलगी जखमी

सकाळ वृत्तसेवा

Rajgad Latest News: रांजणे (ता.राजगड) गावच्या हद्दीत रिक्षाच्या झालेल्या अपघातामध्ये मायलेकाचा मृत्यू झाला असून व विवाहीत मुलगी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवार (ता.१३) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

शालन पासलकर (वय.६५)दिपक पासलकर (वय.४५) मुळगाव गिवशी (ता. राजगड) सध्या राहणार दौंड जि. पुणे यांचा अपघातात मृत्यू झाला असून कविता मरळ (वय.४०) राहणार कानंद (ता.राजगड) या गंभीर जखमी आहेत.

कानंदचे पोलीस पाटील संजय कडू यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आई शालन व मुलगा दीपक हे कानंद येथे मुलीकडे गेले होते. तेथून पाबे घाट मार्गे पुण्याकडे जाताना रांजणे गावच्या हद्दीत हा अपघात घडला.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात झालेल्या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडल्याने रस्त्यामध्ये मोठे झाड पडले होते पडलेल्या झाडाच्या अलीकडेच रांजणे गावच्या हद्दीत असलेल्या छोट्याशा पुलाच्या कठड्याला रिक्षा धडकून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अपघात घडल्याची माहिती खानापूर येथील डॉ.स्वागत रिंडे यांनी आपत्ती व्यवस्थापन ला दिल्यानंतर रेस्क्यू टीमने पडलेले झाड कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. घटनास्थळी मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन टीम मधील सदस्य तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, संजय चोरघे, नीलकंठ लोहकरे, व कैलास दारवटकर यांनी रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस पंचनामा सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Meeting: हरियानातील पराभवाचा नेत्यांना धसका! काँग्रेसच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; मराठा-ओबीसींबाबत घेतला मोठा निर्णय

Supreme Court : कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्ससंबंधी याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले खडे बोल

Latest Maharashtra News Live Updates: ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या भांडणातून व्यक्तीला बेदम मारहाण

Ranji Trophy 2024: ऋतुराजच्या महाराष्ट्राला जम्मू-काश्मीर ठरले वरचढ, पहिलाच सामना ड्रॉ

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला, विप्रो, टेक महिंद्रामध्ये जोरदार खरेदी

SCROLL FOR NEXT