घोरपडी: आपल्या मुलीला किंवा मुलाला शाळेत अॅडमिशन मिळाले नाही तर एखादा पालक काय करेल, तर कोणी आंदोलन करेल, कोणी अधिकारी किंवा मंत्री लोकांना भेटल, पण एका मुलाच्या वडिलांनी मात्र आपल्या मुलाला शाळेत अॅडमिशन मिळाले नाही, त्याचे एका वर्षाचे नुकसान झाले, कोणीही न्याय दिला नाही म्हणून, अखेर बॉम्बने थेट मंत्रालयच उडवून द्यायची ई-मेलद्वारे धमकी दिली. अखेर बऱ्याच वेळानंतर या 'लेकासाठी काय पण' करणाऱ्या वडिलांस पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज कोर्टात हजर करणार आहेत.
तुम्ही 'या शिक्षणाच्या आईचा घो' हा मराठी चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला या घटनेचे गांभीर्य कळेल. एकीकडे कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी त्यांची प्रवेश प्रक्रिया मात्र निर्बंध शिथील झाल्यानंतर हळूहळू राबविण्यास सुरुवात झाली आहे. शेवटी आपल्या लेकाला किंवा लेकीला झकास इंग्लिश मीडियमला प्रवेश मिळावा, असे कुठल्या पालकांना वाटत नाही. त्याच पद्धतीने 'त्या' मुलीच्या वडिलांनाही वाटले.
घोरपडी येथे राहणाऱ्या शैलेश शिंदे (वय 50) यांच्या मुलाला वानवडी येथील एका हाचिंग्स शाळेमध्ये मागील वर्षी प्रवेश घ्यायाचा होता, त्यासाठी त्यांनी प्रक्रिया ही पूर्ण केली, मात्र मुलाला प्रवेश मिळाला नाही, त्यामुळे मुलाचे एका वर्षाचे नुकसान झाले. म्हणून शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वी या प्रश्नाबाबत उपोषण केले होते. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे शिंदे यांनी मंत्रालयात धमकी वजा इशारा ईमेलद्वारे पाठविला होता. याबाबत मंत्रालयातून माहिती मिळताच मुंबईत मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असल्याची माहिती आहे.
त्यानंतर याची खबर पुणे पोलिसांनी मिळाली. त्यानुसार मुंढवा पोलिसांनी शिंदे यांना त्यांच्या घोरपडी मधील राहत्याघरातून ताब्यात घेऊन सोमवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.