Babri Banner in Pune 
पुणे

Babri Banner in Pune: FTIIमध्ये झळकले बाबरी मशिदीचे वादग्रस्त बोर्ड, आक्रमक हिंदुत्ववादी संघटनांकडून जाळण्यात आले बॅनर

पुण्यातील FTII संस्थेत विद्यार्थी संघटनांकडून वादग्रस्त बॅनरबाजी करण्यात आली आहे. 'रिमेम्बर बाबरी- डेथ ऑफ कॉन्स्टिट्युशन'अशा आशयाचे बोर्ड या ठिकाणी झळकत आहेत. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

Manoj Bhalerao

Remember Babri Banners In FTII

पुण्यातील FTII संस्थेत विद्यार्थी संघटनांकडून वादग्रस्त बॅनरबाजी करण्यात आली आहे. 'रिमेम्बर बाबरी- डेथ ऑफ कॉन्स्टिट्युशन'अशा आशयाचे बोर्ड या ठिकाणी झळकत आहेत. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये खळबळ निर्माण झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून हे बॅनर फाडण्यात आले आहेत. त्यानंतर या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केली, असा आरोप काही विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय. त्यामुळे एफटीआयआयमध्ये तणापूर्ण शांतता आहे.

या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचे काही कार्यकर्ते दिसतं आहेत. या कार्यकर्त्यांनी आपल्या हातात बॅनर पकडत झालेल्या प्रकाराचा विरोध दर्शवला. त्याचबरोबर या कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम, हरहर महादेव, भारत माता की जय'अशा घोषणाही दिल्या. (Latest Marathi News)

घडलेल्या घटनेविषयी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा एफटीआयआयमध्ये दाखल झाला. परिसरातील कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी हा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकाराविषयी चौकशी करुन कारवाई करण्याचे पोलीस उपायुक्तांनी आश्वासन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT