Finally announced the schedule of MPSC 
पुणे

मोठी बातमी : अखेर एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर!

सकाळवृत्तसेवा

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) वेळापत्रक जाहीर केले आता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) वेळपत्रक कधी जाहीर होणार असा प्रश्न विद्यार्थांकडुन विचारला जात होता. अखेर एमपीएससीने तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर केल्याने राज्यातील लाखो विद्यार्थांना आता अभ्यासाला  लागावे लागणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एमपीएससीने जाहीर केलेल्या सुधारीत वेळापत्रकात  राज्य सेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब- संयुक्त पूर्व परीक्षा २०२०  ही परीक्षा ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणा आहे. तर  महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे एमपीएससीने  परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
पुण्यात आता पीएपी बससेवा सुरू होणार

राज्यात कोरोनाची साथ वाढत असल्याने एमपीएससीने एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी पुढील वर्षात नवीन पदभरती होणार, असेही जाहीर केले होते. त्यामुळे या परीक्षांसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा होणार की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. एमपीएससीने ही याबाबत काहीच माहिती दिली नव्हती. 'दरम्यान, विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले आहेत तर परीक्षा घ्यावीच लागेल असे तज्ज्ञांकडून स्पष्ट केले जात होते. त्यानुसार एमपीएससीने आज वेळापत्रक जाहीर केले आहे. 

पुण्यात आरटीओचे कामकाज पूर्ववत होणार

एमपीएससीने परीक्षा जाहीर केलेल्या असल्या तरी सोशल डिस्टन्स ठेऊन परीक्षा घेण्याचे अाव्हान आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्या ही वाढण्याची शक्यता आहे. एमपीएससीने याबाबत आज काही माहिती दिलेली नसली तरी कोरोनाचा आढावा वेळोवेळी घेऊन त्याबाबत माहिती संकेतस्थळावर जाहीर केली जाईल, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

झेडपीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून शिक्षक करतात असं काही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित तू थोडक्यात वाचलास.. वाकून नमस्कार करणाऱ्या रोहित पवारांना अजित दादांचा मिश्किल टोला

दाऊदने मला जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून...; Lalit Modi यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, शाहरुख खान...

TRAI New Rules : मोठी बातमी! 1 डिसेंबरपासून OTP बंद होणार? ग्राहकांचा फायदा की नुकसान, नेमकं प्रकरण वाचा

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; निफ्टी 24,200च्या पार, सेन्सेक्स 1300 अंकांनी वर, कोणते शेअर चमकले?

Latest Maharashtra News Updates : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा १५ दिवसांसाठी राहणार बंद

SCROLL FOR NEXT