pune news sakal
पुणे

Pune News : अखेर सिंहगड परिसरातील आदिवासी कातकरी नागरिकांना मिळाले जातीचे दाखले

सकाळ'च्या पाठपुराव्याला यश; महसूल व आदिवासी विकास विभागाची कार्यवाही

निलेश बोरुडे

सिंहगड : हवेली तालुक्यातील तब्बल दोनशे चाळीस आदिवासी कातकरी नागरिकांना अखेर जातीचे दाखले मिळाले आहेत. हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांच्या हस्ते या सर्व नागरिकांना गोऱ्हे बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

कायदेशीर ओळख नसल्याने शासकीय सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी कातकरी समाजाच्या व्यथा दै. सकाळ'ने सातत्याने मांडून त्याबाबत पाठपुरावा केल्यानंतर महसूल विभाग व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्याकडून दखल घेत ही कार्यवाही करण्यात आली आहे.

खडकवासला, एनडीए दहा नंबर गेट, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, बहुली, सोनापूर व आजूबाजूच्या गावांमध्ये आदिवासी कातकरी समाजाच्या वस्त्या आहेत. खेकडे,मासे व रानमेवा विकून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या या समाजातील नागरिकांना 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'नंतरही साधी ओळख सुद्धा मिळालेली नव्हती.

दै. सकाळ'ने याबाबत लक्ष वेधल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख व आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी या आदिवासींना आधार कार्ड देण्यासाठी डोणजे येथे दर बुधवारी शिबीर सुरु केले.

तसेच 30 सप्टेंबर 2022 रोजी खानापूर येथे भव्य कातकरी मेळाव्याचे आयोजन करुन तेथे ज्या नागरिकांचे आधार कार्ड तयार झालेले होते त्यांचे जातीच्या दाखल्यांसाठी अर्ज भरुन घेण्यात आले होते. त्यातील 240 कातकरी नागरिकांना आज 'महसूल सप्ताहानिमित्त' जातीचे दाखले प्रदान करण्यात आले.

यावेळी हवेली उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे, खडकवासला मंडळ अधिकारी हिंदुराव पोळ, डोणजे तलाठी उमेश देवगडे, सुशांत खिरीड, बाजीराव पारगे, सुजित तिपोळे, कालिदास माताळे, अनंता पंडित व आदिवासी कातकरी नागरिक उपस्थित होते.

अजूनही अनेकांना नाही 'ओळख' सिंहगड व पानशेत भागातील डोंगर कपारीत , जंगलात वास्तव्य करत असलेल्या अनेक आदिवासी कातकरी नागरिकांना अद्यापही आधार कार्ड किंवा इतर कोणतेही शासकीय ओळखपत्र मिळालेले नाही.

या समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासकीय पातळीवरून अजून प्रभावी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. तसेच कातकरी समाजासाठी असलेल्या योजनांची आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून प्राधान्याने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

" जातीचे दाखले नसल्याने घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही असे आतापर्यंत सांगण्यात येत होते. ज्यांना जातीचे दाखले मिळाले त्यांना आता लवकर हक्काचा निवारा मिळावा. तसेच आमच्या राहिलेल्या सर्व लोकांना आधार कार्ड, रेशनकार्ड व जातीचे दाखले मिळाले पाहिजेत. आमच्या पुढच्या पिढीला तरी चांगले दिवस पाहायला मिळतील."

- नीरा वाघमारे, आदिवासी महिला कार्यकर्त्या, डोणजे.

" कोणतेही पुरावे व कागदपत्रे नसताना आधार कार्ड पासून सुरूवात करुन आज या आदिवासी कातकरी नागरिकांना जातीचे दाखले देण्यात आले आहेत. सकाळ'ने या नागरिकांच्या समस्यांबाबत लक्ष वेधल्यानंतर आम्ही तातडीने कार्यवाही सुरू केली होती. यापुढेही या वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महसूल विभाग पूर्णपणे प्रयत्न करणार आहे."

- संजय आसवले, हवेली उपविभागीय अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT