fire broke out in the hostel of Tarachand Hospital students in Pune rashta Peth marathi news  sakal
पुणे

Pune Fire News : पुण्याच्या रास्ता पेठेतील विद्यार्थींनींच्या वसतिगृहात आग; शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान जळून खाक

सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचा प्रकार समोर आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे- रास्ता पेठेतील ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, विद्यार्थिनींचे शैक्षणिक आणि इतर साहित्य जळून खाक झाले.

वस्तीगृहात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या मुख्यालय आणि कसबा केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले. तीन मजली असलेल्या वसतिगृहात पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक चारमध्ये आग लागली होती.

जवानांनी प्रथम विद्यार्थिनी सुरक्षित असल्याची खात्री केली. या खोलीतील तीन विद्यार्थिनी आणि वसतिगृहातील इतर सर्वजण बाहेर आले होते. जवानांनी खोलीत आगीवर पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. या घटनेत खोलीमधील शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान व इतर वस्तू पूर्ण जळाल्या. खोलीमधील हिटरमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

आग लागल्याचे समजताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही तेथे उपलब्ध असलेल्या १८ अग्निरोधक उपकरणांचा (फायर एक्स्टिंगविशर) वापरुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाचे अधिकारी पंकज जगताप, वाहनचालक सचिन चव्हाण, समीर शेख, तांडेल सुनील नामे, संजय गायकवाड आणि जवान भूषण सोनावणे, सतीश ढमाळे, अक्षय शिंदे, परेश जाधव, केतन नरके, आतिश नाईकनवरे, शुभम देशमुख यांनी आग आटोक्यात आणली.

अग्निशामक दलाकडून शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, विविध मॉल, इमारतीमध्ये आग लागल्यास आपत्कालीन परिस्थितीत काय उपाययोजना करावी, याबाबत मार्गदर्शन केले जाते. त्याचा नक्कीच उपयोग होतो, हे आज रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले. आग आटोक्यात आणण्यासाठी प्राथमिक स्वरुपात वापरलेली अग्निरोधक उपकरणे नक्कीच महत्वाची ठरली.

- देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशामक अधिकारी, पुणे महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT