पिंपरी - दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी चांगल्या प्रतिसाद मिळाला असून एसटी महामंडळाच्या वल्लभनगर आगाराच्या उत्पन्नात यंदा पाच टक्के वाढ झाली आहे.
एसटी महामंडळाच्या वतीने यंदा लातूर, अकोला, कोल्हापूर, दादर, बोरिवली, नाशिक, उमरगा येथे जाण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत जादा बसची सोय उपलब्ध करून दिली होती. दिवाळीच्या कालावधीत सुरवातीला प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. मात्र, शुक्रवारपासून (ता. २) तो वाढू लागला आहे. महामंडळाच्या वतीने दिवाळीच्या कालावधीसाठी भाडेवाढही केली होती. त्याचाही फायदा महामंडळाला झाला. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सोयीसाठी परतीच्या तिकिटाचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांनी प्रवाशांची चांगलीच लूट केली. त्यामुळे त्यांच्याकडील काही प्रवासी एसटी महामंडळाच्या बसकडे वळाले. या संदर्भात वल्लभनगर आगाराचे स्थानकप्रमुख पी. व्ही. पाटील म्हणाले, ‘‘वल्लभनगर आगाराच्या नेहमीच्या ५२ बस असतात. या व्यतिरिक्त दिवाळीनिमित्त १२ ते १५ ची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे उत्पन्नात पाच टक्के वाढ झाली. सोमवारी (ता. १९) एकादशी असल्याने शुक्रवार (ता. १६) रात्रीपासून बसच्या भाडेदर पूर्ववत होणार आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.