निरगुडसर : मुंबई येथे झालेल्या ४३ व्या राष्ट्रीय मास्टर गेम स्पर्धेत आंबेगाव तालुक्यातील खडकीफाटा येथील हरिश्चंद्र रामभाऊ थोरात यांनी धावणे,चालणे स्पर्थेत दोन सुवर्ण व एक रौप्यपदक पदक पटकावण्याची कामगिरी केली आहे,वयाच्या सत्तरीत देखील हा ७० वर्षाचा तरुण सुवर्णपदकांची कमाई करत आहे.एकूण ११६ मॅरेथॉन स्पर्धेसह आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय,राज्य स्पर्धेत गेल्या १० वर्षात आत्ता पर्यंत ११९ पदकांची कमाई केली असल्याने आंबेगाव तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.
नुकत्याच मुंबई येथे झालेल्या मास्टर्स गेम्स राष्ट्रीय स्पर्धेत खडकीफाटा (ता.आंबेगाव) येथील हरिश्चंद्र रामभाऊ थोरात यांनी ६५ वर्ष व त्या पुढील गटातील धावणे आणि चालणे क्रिडा प्रकारात दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावले आहे.
यामध्ये ६५ वर्ष वयोगटातील आणि त्यापुढील गटातील १० किमी धावणे मध्ये प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावले तसेच ५ किमी चालणेमध्ये सुवर्ण पदक,५ किमी धावणेमध्ये रौप्यपदक मिळवले त्याबद्दल खडकी,चांडोली बुद्रुक ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ७० वर्षाचा तरुण धावपट्टूची १० वर्षात ११९ पदकांची कमाई .
धावपटू हरिश्चंद्र थोरात यांनी ६० वर्षांवरील झालेल्या ऑस्ट्रेलिया व मलेशिया येथील ३ आंतरराष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेत सहभाग घेऊन रौप्य व कांस्य पदक पटकावले आहे तसेच ११ राष्ट्रीय आणि ११ राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स स्पर्धेत १६ सुवर्णपदक पदक,४ रौप्य व २ कांस्य पदक अशी एकूण २५ पदके पटकावण्याचा मान मिळवला आहे तसेच आत्ता पर्यंत ११६ मॅरेथॉन स्पर्धेत विजेतेपद पटकावून विविध ९४ पदके मिळवली असून मागील १० वर्षात ११९ पदकांची कमाई केली आहे.
धावपटू हरिश्चंद्र थोरात यांची १३ ते २५ ऑगस्ट २०२४ स्वीडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघात निवड झाली असून यास्पर्धेत सुवर्ण कामगिरी करण्याचा त्यांचा मानस आहे. फोटो खाली ओळ:खडकीफाटा(ता.आंबेगाव) मास्टर्स गेम्स राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे हरिश्चंद्र रामभाऊ थोरात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.