Chandrakant Patil Sakal
पुणे

पाषाण -सूस रस्त्यावरील उड्डाणपूलाचे उद्घाटन लवकरच होणार - चंद्रकांत पाटील

पाषाण -सूस रस्त्यावरील सूस खिंडीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाचे काम होऊनही सत्ताधाऱ्यांकडून उद्घाटन केले जात नसल्याचे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी रविवार (ता. ४) रोजी उद्घाटन केले होते.

सकाळ वृत्तसेवा

पाषाण -सूस रस्त्यावरील सूस खिंडीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाचे काम होऊनही सत्ताधाऱ्यांकडून उद्घाटन केले जात नसल्याचे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी रविवार (ता. ४) रोजी उद्घाटन केले होते.

औंध - पाषाण -सूस रस्त्यावरील सूस खिंडीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाचे काम होऊनही सत्ताधाऱ्यांकडून उद्घाटन केले जात नसल्याचे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी रविवार (ता. ४) रोजी उद्घाटन केले होते. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आज पुलाची पाहणी केली. व पुढील आठवड्यात शुक्रवार (ता. १६) रोजी सर्वपक्षीय उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती दिली. सूस खिंडीतील पुलाचे आता दुस-यांदा उद्घाटन होणार असल्याने पुलाच्या उद्घाटनाचा विषय यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तर 'यापुर्वी राष्ट्रवादीच्या वतीने केवळ पुलाची पाहणी करण्यात आल्याचे' चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पाहणी दौरा विशेष ठरला आहे. यावेळी नागरिकांच्या मागणीनुसार सेवा रस्त्याची राहिलेली कामे जागा ताब्यात घेऊन तसेच पूलाची बारीक सारीक कामे पूर्ण करण्यात यावीत या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांना मंत्री पाटील यांनी सूचना दिल्या.

तसेच यावेळी बाणेर-सूसरोड रहिवासी विकास मंचच्या वतीने कचरा प्रकल्प इतरत्र हटवण्याची तसेच पदपथ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. रस्त्यामध्ये येत असलेली कचरा प्रकल्पाची भिंत काढून रस्ता रुंदीकरण करण्यात यावे. अशा सूचनाही यावेळी पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या. महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यासाठी आपण तातडीने हा पूल सुरू करणे महत्त्वाचे आहे. असेही ते म्हणाले. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, मालमत्ता विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे, पथविभाग प्रमुख व्हि. जी. कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी, भाजप शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, प्रकाश बालवडकर, उमा गाडगीळ व बाणेर सूसरोड रहिवासी विकास मंचचे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT