बुधवार पेठ - कोथरूड येथे बुधवारी मृत्युमुखी पडलेल्या गव्याच्या पार्श्‍वभूमीवर भारत फ्लॅग फाउंडेशनने पासोड्या विठोबा मंदिराजवळ प्रतिकृती उभारली आहे. त्यासोबत फ्लेक्‍स लावून श्रद्धांजली अर्पण केली आहे. 
पुणे

वन्यप्राण्यांची समस्या हाताळण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उभारण्यावर वन खाते भर देणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - मानवी वस्त्यांमध्ये आढळणाऱ्या वन्यप्राण्यांची समस्या हाताळण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उभारण्यावर वन खाते भर देणार आहे. त्यासाठी लोकसहभाग हे प्रभावी साधन असल्याचा विश्वास वन खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोथरूडमध्ये गजबजलेल्या लोकवस्तीत गवा दिसला आणि त्यानंतर ‘न भूतो न भविष्यति’ असा गोंधळ नागरिकांनी तेथे घातला. गव्याचे फोटो, त्याचे व्हिडिओ काढण्यासाठी प्रचंड गर्दी केली. गव्याला सुरक्षित पकडण्यात या गर्दीचा अडथळा निर्माण झाला, अशा निष्कर्षापर्यंत वन खाते आले आहे. 

याबाबत पुणे वनविभागाचे संरक्षक राहुल पाटील म्हणाले, ‘‘पुण्यातील मानवी वस्त्यांमध्ये वन्य प्राण्याचा वावर होण्याची ही पहिली घटना नव्हती. भविष्यातही अशा प्रकारच्या घटना हाताळताना वन खात्याबरोबर लोकसहभाग महत्त्वाचा आहे. शहराच्या प्रत्येक भागातून पाच जणांना वन्य प्राण्यांच्या बाबतचे प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात येत आहे. त्यामुळे मानवी वस्तीत वन्य प्राणी दिसल्यापासून कशा प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने परिस्थिती हाताळली पाहिजे, याचे प्रशिक्षण यात देणार आहे. त्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.’’

एकाही माणसाला इजा नाही
कोथरूडसारख्या गजबजलेल्या लोकवस्तीत एकाजरी माणसाला गव्याचा धक्का लागला असता तरीही त्याच्या जिवाला धोका होता. मात्र, त्या गव्याने एकाही माणसाला इजा केली नाही, ही सगळ्यात महत्त्वाचे असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या गव्याचा बचाव करण्याची मोहीम तातडीने हाती घेतली. वन खात्याचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळावरच असल्याने निर्णय पटकन घेता आले. मात्र, यात गव्याचे प्राण वाचवू शकलो नाही, अशी खंत वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

काय आहे लोकसहभागाची योजना
१) शहराच्या वेगवेगळ्या भागातून किमान पाच तरुणांची निवड करणे
२) वन्य प्राण्यांच्या मानवी वस्तीतील वावराबद्दलचे प्रशिक्षण देणे
३) मानवी वस्तीतील वन्य प्राण्यांना पकडण्याच्या मोहिमेत त्यांना सहभागी करणे

धावून दमल्यानेच गव्याचा झाला मृत्यू
कोथरूडमध्ये बुधवारी सकाळी आलेला गवा चार वर्षांचा असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. रानगव्याचे नैसर्गिक आयुर्मान २५ ते ३० वर्षे असते. त्यामुळे आणखी किमान २० वर्षे जगणाऱ्या गव्याच्या मृत्यूला पुणेकरच कारणीभूत ठरले, असे वन्यजीव क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

गव्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे तो इकडे-तिकडे धावू लागला. त्यास पकडण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र धावून-धावून दमलेला, थकलेला आणि नाकाला झालेल्या इजेमुळे गव्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. याच्या मृत्यूचे कारण हे त्याला आलेला अतिताण असल्याचे पुणे वन विभागाचे उप वनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT