आंबेगाव - येथील अंगणवाड्याची बकाल अवस्था या मथळ्याखाली सकाळ मध्ये प्रकाशित करण्यात आली होती.त्यानंतर आंबेगावचे माजी उपसरपंच अनिल कोंढरे यांनी पुढाकार घेत सदरील अंगणवाडी क्रमांक १ ची दुरुस्ती स्वखर्चातून केली आहे.
कोरोनापासून अंगणवाड्याची दुरवस्था झाली होती.भींतीवर पाणी गळती लागली होती.शिवाय सतत येणाऱ्या पाण्याने भींती खचल्या होत्या. अंगणवाडीत अक्षरशः पाणी वाहत होते.
त्यानंतर दोन वर्षे अंगणवाडी क्रमांक १ चे दुसऱ्या केंद्रात तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते.शालेय आहारही तिथेच वाटप केला जात होता. परंतु त्याही केंद्रात जागे अभावी मुलांचे हाल होऊ लागले होते.कोरोनानंतर ही शाळा गावठाणातील समाज मंदिरात अंगणवाडी भरली जावू लागली होती.
जिल्हा परिषदेकडे शाळेची डागडुजी करण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी केली होती परंतु शाळा महापालिकेत गेल्या कारणाने तिची देखभालही महापालिकेकडून करण्यात येणार असल्याची माहिती तत्कालीन प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली होती.ed
मुलांचे होत असलेले हाल पाहून अंगणवाडी सेविका शालन शेंडे यांनी अनिल कोंढरे यांचेकडे व्यथा मांडली होती.त्यानंतर कोंढरे यांनी स्वखर्चातून अंगणवाडीची दुरुस्तीसह शाळेवर नवीन पत्रे टाकले शिवाय शाळेची रंगरंगोटी करून लाइटची व्यवस्थाही केली.तसेच दोन पाण्याच्या टाक्याही कोंढरे यांनी बसविल्या आहेत.
स्वखर्चातून केलेल्या कोंढरे यांच्या कामाचे परिसरातील नागरिकांकडून तसेच महापालिकेच्या वतीनेही कौतुक करण्यात आले.
*१९९० पासून सुरू असलेली अंगणवाडी
*६ महिने ते ३ वर्षातील मुले - ८५ मुले
*गरोदर स्त्रिया : ३०
अंगणवाडीची मोठ्याप्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यानंतर आम्ही उपसरपंच अनिल कोंढरे यांचेकडे दुरुस्तीसाठी विनंती केली.त्यांनी लागलीच अंगणवाडीची पाहणी केली मनापासून लक्ष घातले आणि अंगणवाडीचे काम उत्तम पद्धती करून घेतले.एक नव्हे तर दोन केंद्रांची पक्की अंगणवाडी त्यांनी बांधून दिली आहे.
-शालन शेंडे ,अंगणवाडी सेविका अंगणवाडी क्रमांक १
गावातील अंगणवाडीची अशी परिस्थिती पाहून मन सुन्न झाले. शाळेत पटसंख्या चांगली असूनही जिल्हा परिषद आणि मनपा शाळेकडे लक्ष देतील असे वाटले नाही त्यामुळे स्वखर्चातून शाळेचे काम केले.
- अनिल कोंढरे , माजी उपसरपंच आंबेगाव बुद्रुक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.