Shivajirao Adhalrao and dilip mohite patil sakal
पुणे

Shivajirao Adhalrao : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चेवर आमदार दिलीप मोहिते यांचा नाराजीचा सूर

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार व ते महायुतीतून शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळवतील अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

हरिदास कड

चाकण - माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार व ते महायुतीतून शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळवतील अशी जोरदार चर्चा रंगली आहे. माजी खासदार आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केलेली आहे. त्यामुळे ते नक्की काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.माजी खासदार आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी मात्र नाराजीचा सूर आळवला आहे.

गेल्या वीस वर्षापासून माजी खासदार आढळराव पाटील खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यात मात्र अनेक वेळा राजकीय संघर्ष, टोकाची टीकाटिप्पणी, वादविवाद अनेक वेळा झाले आहेत. माजी खासदार आढळराव पाटील यांना महायुतीत लोकसभेची उमेदवारी मिळवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसची वाट चोखाळावी लागणार आहे असा अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सल्ला आहे असेही सांगितले जाते.

माजी खासदार आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्ष पद मिळाल्यानंतर लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही अशीही जोरदार चर्चा रंगली आहे. परंतु माजी खासदार आढळराव पाटील यांनी पराभूत झाल्यानंतरही लोकसभा मतदारसंघात जनतेशी संपर्क कायम ठेवला आहे. शिवाय आंबेगाव तालुक्यात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची ताकद त्यांना राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर अधिक मिळणार आहे.

त्यामुळे माजी खासदार आढळराव पाटील हे राष्ट्रवादीकडे जातील अशी जोरदार शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाच्या चर्चेवर आमदार दिलीप मोहिते यांनी मात्र नाराजीचा सूर आळवला आहे. माजी खासदार आढळराव पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक आमदार दिलीप मोहिते यांनी याबाबत सांगितले की, मी गेली वीस वर्षे त्यांच्याबरोबर राजकीय संघर्ष केला आहे. चुकीचे राजकारण करण्यापेक्षा मी घरी बसेन.'

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत ते उपनेते आहेत. त्यांना चौथ्यांदा शिरुर लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. यासाठी आढळराव पाटील यांनी गेली पाच वर्ष जोराची तयारी मतदार संघात केली आहे. जनसंपर्क ठेवला आहे. जाहिरात बाजी केली आहे. विविध कामे मार्गी लावली आहेत.

वेळप्रसंगी शिरूरची उमेदवारी मिळण्यासाठी आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा चर्चाही रंगत आहे. भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी उपस्थित राहून चाकणला लोकसभा निवडणुकीबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मेळावे ही घेतले आहेत.

त्यामुळे महायुतीत नेमकी शिरूरची जागा राष्ट्रवादीला मिळते की शिवसेना शिंदे गटाला, भाजपला मिळते हा ही प्रश्न अजून तरी अनुत्तरित आहे. अजून महायुतीचे जागावाटप झालेले नाही त्यामुळे नक्की काय होईल हे चित्र स्पष्ट होत नाही. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा बालेकिल्ला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुतीत या जागेवर दावा केलेला आहे असेही वर्तविले जात आहे. याबाबत आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले की, 'माजी खासदार आढळराव पाटलांच्या प्रवेशाच्या चर्चा मी ही ऐकत आहे. मी राजकारणात अनेक वर्ष त्यांना ठामपणे विरोध केला आहे. आढळराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले तर मी राजकारण करण्यापेक्षा घरी बसेन. राजकारण हे तत्वनिष्ठ असावे. तत्वाला मी मानतो.

आयाराम, गयारामांचं राजकारण सध्या सुरु आहे. त्या राजकारणाला काही अर्थ नाही. तसं राजकारण मला करायचं नाही. शेवटी पक्ष त्यांचं स्वागत करणार असेल तर मी त्यावर काही बोलणार नाही. शेवटी पक्ष आणि पक्षप्रमुख यांचा निर्णय महत्वाचा आहे. मी माझे वैयक्तिक निर्णय घेऊन काय करायचे हा माझा अधिकार आहे.

ज्यांनी मला तुरुंगात टाकण्यापर्यंत, मला आयुष्यातून उठवण्यापर्यंत भूमिका घेतली तसे प्रयत्न केले. त्यांच्याबरोबर काम करायचं किंवा नाही करायचं ते मी ठरवेन. तो सर्वस्वी माझा निर्णय असेल. मी माझ्या लोकांना विचारून निर्णय घेईल. मी गेल्या वीस वर्षांपासून त्यांच्याशी राजकारणात भांडतोय. त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन माझ्याबरोबर राजकारण केलं आहे हे मी विसरू शकत नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT