पुणे : आपल्यावरील गोळीबाराचा बदला घेण्यासाठी सराईत गुन्हेगारांना आरोपीच्या हत्येची सुपारी देणाऱ्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी नगरसेवकास कोंढवा पोलिसांनी बुधवारी रात्री राजस्थानमधून अटक केली. कोंढवा पोलिसांचे पथक मागील तीन दिवसांपासून संशयित आरोपीच्या मागावर होते.
विवेक यादव असे पोलिसांनी अटक केलेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. तर यापूर्वी राजन जॉन राजमनी (वय 38, रा.भाग्योदय नगर, कोंढवा), इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख (वय 27, रा काळा खडक, वाकड, पिंपरी-चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड रजेवर येरवडा कारागृहाबाहेर आलेला सराईत गुन्हेगार राजन जॉन राजमनी व त्याचा मित्र इब्राहीम शेख या दोघांनी कोणाच्या तरी खुनाची सुपारी घेतली असून त्यांच्याकडे शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, राजन राजमनी हा दुचाकीवरुन लुल्लानगर परिसरात फिरत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून राजन व इब्राहीमला अटक केली. त्यांची अंगझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे तीन गावठी पिस्तुल, जिवंत काडतुसे व सव्वा लाखाची रक्कम आढळली होती. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली, तेव्हा विवेक यादव याच्यावर चार वर्षांपुर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीत गोळीबार करणाऱ्या बबलू गवळीला मारण्यासाठी यादवने सुपारी दिल्याची त्यांनी कबुली दिली. राजनच्या मोबाईलची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये व्हिके व व्हिके न्यु हे मोबाईल क्रमांक आढळले. दोन्ही मोबाईलवरील संभाषण पोलिसांना संशयास्पद वाटले.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून कोंढवा पोलिसांचे पथक विवेक यादवच्या मागावर होते, यादव हा राजस्थान परिसरात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक कापुरे यांच्या मार्गदर्शनखालील पथक बुधवारी रात्री राजस्थानच्या सीमाभागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने त्यास अटक करुन पुण्याला आणण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.