Fossils of an unknown animal found during excavation of Maha Metro in Mandai Pune 
पुणे

Sakal Exclusive : मेट्रो खोदकामावेळी पुण्यात सापडले भल्यामोठ्या प्राण्यांचे अवशेष; हत्तीची हाडं असल्याचा निष्कर्ष

मंगो

पुणे : मेट्रो मार्गासाठी खोदकाम सुरू असताना बुधवारी दुपारी मोठ्या आकाराच्या प्राण्यांची हाडं सापडली. त्यामुळे शहरात चर्चेला धुमारे फुटले. सुमारे 200 वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या हत्तीची ही हाडं असल्याचा निष्कर्ष पुरातत्त्व अभ्यासकांनी "सकाळ'शी बोलताना गुरुवारी मांडला. महात्मा फुले मंडई, नेहरू रस्ता या भागात पूर्वी पेशवाई होती. त्यामुळे खोदाई दरम्यान आणखी काही सापडू शकतं, असेही त्यांनी म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड- स्वारगेट मार्गावरील मेट्रोसाठी महात्मा फुले मंडईत खोदकाम सुरू आहे. त्या ठिकाणी मेट्रोचा मार्ग भुयारी असून तेथे भुयारी स्थानकही होत आहे. मंडईत कांदा मार्केटजवळ खोदकाम सुरू असताना बुधवारी दुपारी मोठ्या आकाराची अनेक हाडं सापडली. हे काही तरी वेगळे असावे, म्हणून खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराने महामेट्रोशी संपर्क साधला. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व अभ्यासकांशी संपर्क साधला. त्यांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळ आणि हाडांची पाहणी केली, अशी माहिती महामेट्रोचे जनसंपर्क विभागाचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली.

'...म्हणून आत्महत्या नाही करू शकलो'; गौतम पाषाणकरांनी सांगितली 'मन की बात'!​

या बाबत पुरातत्व अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. ते म्हणाले, ""सुरवातीला आम्हाला 10 मीटर खोदकाम केल्यावर हाडं सापडली, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात पाहणी केल्यावर ही हाडं सुमारे 3 मीटर खोदकाम करताना सापडली आहेत. त्यांची पाहणी केल्यावर ती जिवाश्‍म नाही, असे उघड झाले. मोठी हाडं ही हत्तीची आहेत. तर, दुसरी हाडं ही नीलगाय अथवा गाय, बैलाची असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या बाबत अजूनही तपासणी सुरू आहे.'' सुमारे पन्नास वर्षांपूर्वीही अरण्येश्‍वरमध्ये सुमारे दहा फूट खोदकाम करताना हत्तीचा सांगाडा सापडला होता.

मध्ययुगीन इतिहासाचे आणि जुन्या पुण्याचे अभ्यासक मंदार लवाटे म्हणाले, "मंडईच्या कांदा मार्केटपासून काही अंतरावर नेहरू रस्त्याच्या बाजूला हत्ती महाल नावाची इमारत आहे. पेशव्यांचे हत्ती तेथे बांधले जात. त्यामुळे एखादा मृत्युमुखी पडलेला हत्ती तेथेच खोदकाम करून पुरण्यात आला असावा, असे वाटते.'' मंडईची काही जागा ही पूर्वी पेशव्यांची बाग होती. ती चकले बाग नावाने ओळखली जात. नंतर ती खासगीवाले यांच्याकडे आली. त्यांच्याकडून महापालिकेने खरेदी करून 1965 मध्ये मंडईची नवी इमारत बांधली आणि तेथे भाजी विक्री सुरू झाली, अशीही माहिती त्यांनी दिली. कांदा मार्केटजवळ पूर्वीच्या चकले बागेत सर्कस उतरत असे. त्यातील हत्ती अथवा नील गायीचा मृत्यू झाला, तेथेच खड्डा करून त्यांना पुरण्यात आले असावे, अशीही शक्‍यता त्यांनी वर्तविली.

Corona Updates: ३५ दिवसांनंतर पुणे जिल्ह्यात पुन्हा रुग्णांचा आकडा हजारापार!

पुण्यात 1818 पर्यंत पेशवाई होती. त्या काळात हत्ती, घोडे मुबलक प्रमाणात पुण्यात होते. त्यामुळे हत्तीची हाडं सापडणे, पुण्यासाठी ही काही मोठी घटना नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT