पुणे ः डेटींगसाठी तरुणी पाठविण्याचा बहाणा करून एका वृद्ध नागरिकांना अनोळखी व्यक्तींनी तब्बल पावणे चार लाख रुपयांना गंडा घातला. या घटनेनंतर वृद्ध नागरिकाने समर्थ पोलिस ठाण्यात जाऊन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी क्वार्टर गेट येथे राहणाऱ्या 68 वर्षीय नागरिकाने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 13 जुलै ते 10 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे क्वार्टर गेट येथे राहतात. त्यांना 13 जुलै रोजी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने फिर्यादी यांना डेटींगसाठी तरुणी पाठविण्याचे आश्वासन दिले. त्यास फिर्यादींनीही प्रतिसाद दिला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने फिर्यादी वेगवेगळी कारणे सांगून ऑनलाइन माध्यमाद्वारे नोंदणी करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून एका बॅंक खात्यात वेळोवेळी पैसे पाठविण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी पैसे पाठविल्यानंतर त्यांना दुसऱ्या एका मोबाईलद्वारे संपर्क साधण्यात आला.
"तुम्ही डेटींगसाठी नोंदणी केली असल्याने तुमच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल.' अशी भीती दाखवून संबंधित नोंदणी रद्द करायची असेल तर आणखी पैसे पाठवावे लागतील, अशी धमकी देऊन फिर्यादीकडून पावणे चार लाख रुपयांची रक्कम अनोळखी व्यक्तींनी उकळले. त्यानंतरही त्यांच्याकडून पैशांसाठी मागणी सुरू होती. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून फिर्यादीने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासानंतर सायबर पोलिसांकडून हा गुन्हा समर्थ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.