crime news crime news
पुणे

Pune : सोसायटीच्या कर्मचाऱ्यांकडून चार लाख रुपयांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शंकरशेठ (shankarsheth) रस्त्यावरील एका सहकारी गृहरचना संस्थेच्या कर्मचाऱ्यांनीच तीन लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोसायटीच्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध स्वारगेट पोलिस (swarget police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरीफ अब्दुल रज्जाक शेख (वय 38, रा. साईबाबानगर, कोंढवा), नवनाथ महादेव गायकवाड (वय 47, रा. शुक्रवार पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी आनंद पार्क सोसाटीचे अध्यक्ष पंडीतराव हरी पाटील (वय 70) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऑक्‍टोंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा आनंद पार्क सोसायटीमध्ये पंप ऑपरेटर म्हणून तर गायकवाड हा वरिष्ठ कारकून म्हणून सोसायटीच्या कार्यालयात काम करीत होते. सोसायटीचा देखभाल खर्च व रंगरंगोटी शुल्क आकारणीची व बॅंकेसंदर्भातील कामे देखील दोघेच करतात. या कामासाठी दोघांना कामासाठी सहा लाख एक हजार रूपये दिले होते. त्यापैकी शिल्लक राहिलेले तीन लाख 90 हजार रूपये या दोघांनी सोसायटीच्या खात्यावर जमा न करता सोसायटीची फसवणूक केल्याचे पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'त्यांची नियत नीट नव्हती, म्हणून त्यांच्या हातून अनावरण झालेला पुतळा कोसळला'; राहुल गांधींचा भाजपला सणसणीत टोला

Mahindra Thar Roxx : ‘थार रॉक्स’ला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद; एका तासात विक्रमी १ लाख ७६ हजार गाड्यांची नोंदणी

कमला हॅरिस, तुलसी गॅबार्ड अन् उषा व्हान्स.. अमेरिकन राजकारणात भारतीयांचे वाढले महत्व

खेळाडूंनी MS Dhoni कडून बरंच काही शिकायला हवं; पाकिस्तानच्या माजी खेळाडूकडून कौतुक अन् गौतम गंभीरबद्दल म्हणाला...

Gondia Crime : खून करून मृतदेह खड्ड्यात पुरला...चार दिवसांनंतर झाला उलगडा; उधारीच्या पैशावरून मालकानेच घेतला जीव

SCROLL FOR NEXT