Pune news esakal
पुणे

Pune Crime : पार्ट टाइम जॉबच्या आमिषाने संगणक अभियंत्याची फसवणूक

पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून संगणक अभियंत्याची १६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

प्रशांत पाटील

पुणे - पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून संगणक अभियंत्याची १६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत धानोरी येथील एका ४८ वर्षीय संगणक अभियंत्याने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी संगणक अभियंत्याला व्हॉटसअप आणि टेलिग्रामवर संदेश पाठवून पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवले. ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी सुरवातीला अभियंत्याच्या बँक खात्यात पैसे जमा केले.

त्यानंतर चोरट्यांनी अभियंत्याचा विश्वास संपादन करून ऑनलाइन टास्कमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार अभियंत्याने सायबर चोरट्यांनी दिलेल्या बॅंक खात्यात वेळोवेळी १६ लाख ५० हजार रुपये जमा केले. परंतु त्यानंतर चोरट्यांनी कोणताही परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अभियंत्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय भापकर करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ती भिंत तोडणारच.. ५०% आरक्षणावरुन राहुल गांधींचा घणाघात, सविधान सन्मान संमेलनात केला हल्लाबोल

ते पुन्हा आले! US Presidential Election मध्ये शानदार विजय, पहिल्याच भाषणात Donald Trump काय म्हणाले?

भ्रष्ट नेत्यांनाच पुन्हा तिकीट का देता? नाना पाटेकरांचा थेट सवाल; फडणवीसांच्या उत्तराने उंचावतील भुवया

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, आता भारतीय इंजिनीअर्सच्या नोकऱ्या जाणार का?

Ranji Trophy 2024: ६०००+ धावा अन् ४००+ विकेट्स; असा पराक्रम करणारा पहिला भारतीय, पण टीम इंडियात संधी नाही

SCROLL FOR NEXT