पुणे - इलेक्ट्रीक वस्तू खरेदी केल्यास 90 टक्के "कॅशबॅक' (Cashback) देण्याचे आमिष दाखवून दाम्पत्याने एका नागरीकाची तब्बल 14 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Fraud of Rs 14 Lakh for 90 Percent Cashback Crime)
दुर्गा परमानंद ऊर्फ ममता ओम सावरीया आणि ओम सावरीया (दोघेही रा. नगर रोड, वाघोली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सोपान भाऊसाहेब येवले (वय 35, रा.केसनंदर रोड, वाघोली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 31 डिसेंबर 2019 ते 14 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी येवले हे शहरातील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांनी आरोपी सावरिया याच्या "बीट फॉक्स एंटरप्रायझेस' नावाच्या इलेक्ट्रीक दुकानातून फ्रिज, वॉशिंग मशिन, सोफा अशा वस्तू खरेदी केल्या होत्या. त्यावेळी सावरिया दाम्पत्याने येवले यांना त्यांच्याकडे सुरू असलेल्या 90 टक्के कॅशबॅक योजनेची माहिती दिली होती.
फिर्यादींनी प्रारंभी काही वस्तु खरेदी केल्यानंतर त्यांना 90 टक्के कॅशबॅकचे पैसे पुढील चार महिन्यांच्या तारखा टकून धनादेश दिले होते. फिर्यादी यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून गाडी खरेदीसाठी आरोपींना सहा लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम दिली. काही दिवसांनी दाम्पत्याने त्यांचे दुकान बंद केल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले. फिर्यादींनी त्यांची चौकशी केली, तेव्हा, संबंधीत दाम्पत्य तेथून पळून गेल्याची माहिती त्यांना मिळाली. फिर्यादी त्यांच्या मुळ गावी नगर येथे गेले होते, त्यानंतर लॉकडाऊन लागल्याने त्यांना यासंदर्भात फिर्याद देण्यास विलंब झाला. सहा लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम व कॅशबॅकची 7 लाख 74 हजार 631 रुपये अशी एकूण 14 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.