Pune Traffic sakal
पुणे

Pune Traffic : नांदेड सिटीच्या प्रवेशद्वारावर वारंवार कोंडी;अरुंद रस्ता, अवजड वाहनांमुळे समस्या

सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी प्रवेशद्वार व नांदेड फाटा या ठिकाणी दर शनिवारी व रविवारी संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे. यातील एक भाग शहर व दुसरा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी प्रवेशद्वार व नांदेड फाटा या ठिकाणी दर शनिवारी व रविवारी संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे. यातील एक भाग शहर व दुसरा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. या दोन्ही ठिकाणी रस्ता अरुंद आहे. मात्र वाहतूक पोलिसांचा अभाव आणि वाहनचालकांची घाई यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे‌. याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे

मागील आठवड्यातही नांदेड सिटीच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवार (ता. २४) व शनिवार (ता. २५) हे सलग दोन दिवस संध्याकाळी कोंडी होती. त्यामुळे वाहनचालकांसह स्थानिकांनाही याचा त्रास सहन करावा लागला. शनिवारी संध्याकाळी सव्वासात वाजता या ठिकाणी वाहन बंद पडल्याने कोंडी झाली होती.

अवजड वाहनांची वाहतूक

नांदेड फाटा परिसर ग्रामीण पोलिस दलाच्या हवेली पोलिस ठाण्यात येतो. येथे वाहतुकीला अडथळा करणाऱ्या मंदिरासह इतर अतिक्रमणे हटविले आहेत. या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे होते. ते अद्यापही झालेले नाही. नांदेड फाटा येथे गावात जाण्यासाठी जुना रस्ता आहे. येथे अनेक औद्योगिक व्यवसाय आहेत. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक सातत्याने सुरूच असते. त्यामुळे कधी-कधी कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथे एका वॉर्डनची नेमणूक केलेली आहे. त्या वॉर्डनलाच दम देतात. येथे वाहतूक पोलिसच पाहिजेत.

नांदेड सिटी प्रवेशद्वाराच्या परिसरात झालेल्या कोंडीत अर्धा तास अडकलो होतो. त्यावेळी तेथे वाहतूक पोलिस नव्हते. येथील वाहतूक दिवे सुरू नसतील तर गर्दीत वाहतूक पोलिसांनी यांनी नियमन करावे. प्रवेशद्वारासमोरील गर्दी असल्याने वाहनांना अडथळा होतो.

- अभिजित घुले,

अध्यक्ष परिवर्तन संस्था

नांदेड फाटा चौकात रस्त्यालगत रिक्षा उभ्या असतात. अशातच दुकानात जाणाऱ्यांची वाहनेही रस्त्यावर असल्याने कोंडी होते. ग्रामीण पोलिस दलाचे वॉर्डन आहेत. काही वाहनचालक येथे अतिक्रमण कारवाई झाली पण या रस्त्याचे रुंदीकरण होणार की नाही याबाबत शंका आहे.

-अमोल गायकवाड, नांदेड

खडकवासला-सिंहगड परिसरात पर्यटकांची गर्दी असते. संध्याकाळी ही गर्दी पुण्याच्या दिशेने जात असते. तसेच यातून नांदेड सिटीचे रहिवासी आत जात असल्याने वाहतूक कोंडी होते. यावर उपाययोजना केली जाईल.

- राजकुमार बर्डे,

सहाय्यक पोलिस निरीक्षक, सिंहगड रस्ता वाहतूक विभाग

वाहतूक दिवे कधी होणार सुरू

नांदेड सिटी प्रवेशद्वाराचा परिसर शहर पोलिस आयुक्तालयात आहे. धायरी फाट्याकडून नांदेड सिटीमध्ये तसेच खडकवासल्याकडून शहराकडे जाणारे पर्यटक यांच्या बेशिस्तपणामुळे ही कोंडी होते. या रस्त्यावर वाहतूक दिवे यंत्रणा बसविली आहे. परंतु हे दिवे काही दिवसांपासून बंद आहे. तसेच येथे वाहतूक पोलिसांकडूनही योग्य ती कार्यवाही केली जात नाही. शनिवारी येथील काही स्थानिक तरुण रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रण करताना दिसून आले. येथील वाहतूक दिवे कधी सुरू करणार? असा प्रश्‍न या तरुणांकडून विचारण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी परिवाराच्या आड कधी राजकारण आणलं नाही मात्र... राज ठाकरेंनी 'ती' खदखद बोलून दाखवली!

Sports Bulletin 10th November: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा ते ऋषभ पंतबाबत CSK च्या सीईओने दिली प्रतिक्रिया

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील मतदारांच्या मनात काय? नागरिकांना ५ दिवसांआड पाणी अन् व्यापाऱ्यांना पार्किंगची अपेक्षा; विडी उद्योगातील महिलांना मुला-मुलींच्या भविष्याची चिंता

Sharad Pawar: संघटनेत सक्रिय राहून पक्ष बांधणी करणार!

कांदा उत्पादक पुन्हा अडचणीत! ओल्या कांद्याच्या भावात ६०० रुपयांची घसरण; प्रतिक्विंटल २६०० रुपयांचा सरासरी भाव; अवकाळी पावसाची शेतकऱ्यांना धास्ती

SCROLL FOR NEXT