Pune News esakal
पुणे

Pune News : २३ गावांतील सांडपाणी व्यवस्थापनासाठी जायकाकडून वित्तपुरवठा

सकाळ डिजिटल टीम

पुणे ः समाविष्ट २३ गावात सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यासाठी पुणे महापालिकेने १३६७.९४ कोटी रुपयांची योजना तयार केली आहे. यासाठी महापालिका बँकेकडून तब्बल ५३० कोटी रुपयांचे कर्ज घेणार होती. मात्र आता कर्ज काढण्याचा प्रस्ताव बाजूला ठेवण्यात आला आहे. त्याऐवजी जपान इंटरनॅशनल को ऑपरेटिव्ह एजन्सीकडून (जायका) अल्पदराने कर्ज घेऊन घेण्यासाठी चाचपणी केली जाणार आहे. त्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक होणार आहे.

राज्य सरकारने जुलै २०२१ मध्ये शहराच्या हद्दीलगतची २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. या भागात झपाट्याने वाढणारे बांधकाम, लोकसंख्या यामुळे सांडपाण्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. २०१७ मध्ये महापालिकेत ११ गावे समाविष्ट करण्यात आली. तेथे सांडपाणी वाहिनी व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची ३९२ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. याच पद्धतीने

२३ गावांसाठीही सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करावी लागणार आहे. महापालिकेने २०५४ पर्यंतची लोकसंख्यावाढ गृहीत धरून केला आहे. यामध्ये एकूण ४७१ किलोमीटर लांबीच्या सांडपाणी वाहिन्या असून, त्याला जोडणाऱ्या ९०.४२ किलोमीटरच्या मुख्य सांडपाणी वाहिन्या असणार आहेत. या कामासाठी ९२२.६५ कोटीचा खर्च आहे. म्हाळुंगे, पिसोळी, नांदेड, होळकरवाडी, वाघोली, मांजरी, गुजर निंबाळकरवाडी असे २०१ एमएलडीचे क्षमतेचे सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असणार आहेत. त्याचा खर्च ४४५ कोटी रुपये इतका असेल. यासह इतर कामे असे मिळून १३६७ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.

हा खर्च मोठा असल्याने महापालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी बँकांकडून कर्ज काढून निधी उपलब्ध करण्यासाठी बँकांकडून प्रस्ताव मागविले होते. पण बँकांकडून पावणे सात टक्के, सात टक्के असे दर देण्यात आले. महापालिका कर्ज काढणार असल्याने प्रशासनावर टीका करण्यात आल्याने ही प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यानंतर जायकाकडून वित्त पुरवठा करण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे.

अल्पदरात ८५ टक्के कर्ज

मुळामुठा शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामासाठी जायकाकडून ८४१ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे. त्याचा व्याजदर एक टक्केपेक्षा कमी आहे. त्याच पद्धतीने २३ गावातील प्रकल्पासाठी जायकाकडून कर्ज घेण्यात येणार आहे. १३६७.९४ कोटी रुपयांपैकी ५३३.७५ कोटी रुपये केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून मिळणार आहेत. तर उर्वरित ८३४.१९ कोटी रुपयांसाठी जायका सोबत महापालिका चर्चा करणार आहे. या रकमेच्या ८५ टक्के कर्ज अल्पदरात महापालिकेला उपलब्ध झाल्यास मोठा प्रकल्प करण्याचा मार्ग खुला होणार आहे. यावर १० जून रोजी बैठक होणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT