पिंपरी - प्राधिकरण, पेठ क्रमांक २६ येथे उभारण्यात येणाऱ्या ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे काम अद्याप संथ गतीने सुरू आहे. अंतर्गत इंटेरिअरसह काम पूर्ण होण्यासाठी ऑगस्ट २०१९ उजाडणार आहे. तोपर्यंत नाट्यकलाकार आणि नाट्यरसिकांच्या पदरी प्रदीर्घ प्रतीक्षा आहे.
पिंपरी-चिंचवड शहर उद्योगनगरी असले, तरी शहरात सांस्कृतिक आवड असलेला एक वेगळा रसिकवर्ग आहे. नव्या पिढीतील तरुणाईला नाटकांची आवड आहे. प्राधिकरणासारख्या नियोजनबद्ध विकास झालेल्या भागात गदिमा नाट्यगृह होत असल्याने येथील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवली जाणार आहे.
मात्र, नाट्यगृहाचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहेत; तर पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह उपलब्ध आहेत. पर्यायाने नाट्य कलाकार आणि नाट्यप्रेमींची गैरसोय होत आहे.
दृष्टिक्षेपात नाट्यगृह
कामाला सुरवात : ऑगस्ट २०१६
मुख्य नाट्यगृह (आसन क्षमता) : ७६८ खुर्च्या
मिनी नाट्यगृह (आसन क्षमता) : २२० खुर्च्या
कॉन्फरन्स हॉल (आसन क्षमता) : २०० खुर्च्या
अन्य सुविधा : खुला रंगमंच, कलाकारांसाठी १२ खोल्या (गेस्ट रूम), रेस्टॉरंट
पार्किंग व्यवस्था : ४०० चारचाकी वाहनांची सोय
नाट्यगृहासाठी अपेक्षित खर्च : ३७.५ कोटी
नाट्यगृहाचे काम करताना महापालिका प्रशासनाने कलाकारांची मते विचारात घ्यायला हवी. कलाकारांना नाट्यगृहांमध्ये नाटकांच्या सरावासाठी छोट्या हॉलची गरज असते. त्याची तजवीज व्हायला हवी. गदिमा नाट्यगृहाचे काम लवकर व्हावे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह लवकर सुरू झाल्यास तेथे राज्य नाट्य स्पर्धा घेता येतील. पिंपळे गुरव येथील निळू फुले रंगमंदिरात रंगमंचावर प्रकाश योजना, नेपथ्य यांची पुरेशी सोय करावी.
- नरेंद्र आमले, सदस्य, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ
गदिमा नाट्यगृहाचे स्थापत्यविषयक काम फेब्रुवारी २०१९ पर्यंत; तर अंतर्गत इंटेरिअरचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर नाट्यगृह रसिकांसाठी खुले केले जाईल.
- शिरीष पोरेड्डी, प्रवक्ता, स्थापत्य विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.