पुणे - गणेशोत्सवाची ‘क्रेझ’ आता जगभरात पोचली असून, अनिवासी भारतीय आपल्यापेक्षा कणभर जास्तच भाविकतेने भारतीय सन साजरे करतात. अशाच प्रकारे सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळाने यंदा मोठ्या जल्लोषात गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. ज्यात विविध आरत्यांपासून ते ढोल-ताशांच्या गजरापर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे.
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
सिंगापूरमधील गणेशोत्सवासाठी श्रींच्या प्राणप्रतिष्ठेला तेथील भारताचे उच्चायुक्त डॉ. शिल्पक अंबुले उपस्थित होते. त्यांच्या हस्ते केवळ गणपतीची नव्हे तर शंकराची, पांडुरंगाची तसेच या आरत्यामध्ये कायमचे स्थान मिळवलेल्या ज्ञानराजांची आरतीचा समावेश होता.
धार्मिक वातावरण आणि ढोल ताशांच्या गजरात घणेशाती प्रतिष्ठापना झाल्याचे सिंगापूरमध्ये प्रत्यक्ष उपस्थित असलेले पुणेकर मंदार रेडे सांगतात. गणेशोत्सवासाठी त्यांना खास महाराष्ट्र मंडळाचे निमंत्रित आले होते. तेथील गणेशोत्सवाचे वर्णन करताना मंदार रेडे सांगतात, ‘‘परदेशात हिंदू सण साजरे करायला अनेक राजकीय आणि सामाजिक बंधने असतात.
त्यामुळे तिथे गणेशोत्सव कसा साजरा होत असेल, याचे कायम कुतूहल वाटत होते. योगायोगाने महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे आमंत्रण मिळाले. आम्ही गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पोचलो तर सभागृहातील वातावरण खूप धार्मिक व प्रसन्न वाटत होते.
पारंपरिक वेशभूषा परिधान करून अनेक अनिवासी भारतीय कुटुंबे आरतीची वाट बघत होती. एका बाजूला पारंपरिक वेशात स्थानिक मंडळींचे ढोल पथक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे अनेक कुटुंबे आपल्या मुलांना घेऊन आली होती व आपल्या पाल्यांना गणेशोत्सवाचे महत्त्व सांगताना दिसली.’’ सिंगापूरमध्ये पुढील दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जाणार असून, केवळ मराठी नाही तर प्रत्येक अनिवासी भारतीय उत्सवात सहभागी होत असल्याचे रेडे यांनी सांगितले.
पाच हजार भारतीयांचे दर्शन
सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळात सुमारे १२०० पेक्षा जास्त सभासद आहेत. जे दर महिन्याला आपले पारंपरिक हिंदू सण जसे की होळी, गुढीपाडवा, गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी सण एकत्रपणे उत्साहाने साजरे करतात. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात पाच हजार पेक्षा जास्त भारतीय दर्शनाला येतात. अथर्वशीर्ष पठण, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनपर उपक्रम असा भरगच्च कार्यक्रम असतो, ढोल ताशाचा गजर आपले पाय आपसूक थिरकायला लावतो, असे मंदार रेडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.