mancher  sakal
पुणे

Ganeshotsav : मंचर शहर,परिसरातील गणेश मंडळांनी प्रबोधन करणारे देखावे सादर करावेत - मंचर पोलीस निरीक्षक

विसर्जन मिरवणुकीतगुलाला ऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळण्याचा उपक्रम कौतुकास्पद

डी. के वळसे पाटील

मंचर - “मंचर शहर व कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळानी प्रबोधन करणारे सामाजिक उपक्रम राबवून जनजागृतीचे काम करावे. देखाव्यामुळे कोणाच्याही भावना दुखवतील अश्या प्रकारचे देखावे कोणीही सादर करू नये. ध्वनीक्षेपकाच्या आवाजावर नियंत्रण ठेवावे. आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा.” असे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी केले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त शनिवारी (ता.१६) आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत मांडगे बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार सचिन वाघ,मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, महावितरणचे सहाय्यक अभियंता अनिलकुमार डोंगरे, माजी सरपंच दत्ता गांजळे, सुहास बाणखेले, वसंतराव बाणखेले,प्रवीण मोरडे, अरुण बाणखेले, रंगनाथ थोरात,सुमन फलके, संजय मोरे उपस्थित होते.

जाधव म्हणाले “गणेश मंडळांनी परवानगी घेणे बंधनकारक आहे.अर्ज प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब परवानगी दिली जाईल. क्रीडा संकुलाजवळ तयार केलेल्या हौदात गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील.”

सचिन वाघ म्हणाले “देखावे उभे करताना राष्ट्रीय एकात्मतेवर व पर्यावरणावर आधारित भर द्या.”

“गणेश मंडळांना ताबडतोब वीज जोड दिला जाईल.” असे डोंगरे यांनी सांगितले. संतोष बाणखेले, दत्ता थोरात, जगदीश घीसे, मनीषा गावडे,गणेश खानदेशे, संजय मोरे, बाजीराव मोरडे, आदींनी चर्चेत भाग घेतला. पोलीस नाईक राजेश नलावडे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT