gang of extortionists terror in Shirur Five pistols with nine live cartridges seized pune crime marathi news Sakal
पुणे

Pune Crime : शिरूर तालुक्यात दहशत निर्माण करणारी खंडणीखोरांची टोळी गजाआड

टोळीकडून नऊ जीवंत काडतूसासह पाच गावठी पिस्तूल जप्त

नितीन बारवकर

शिरूर : तालुक्याच्या पश्चिम भागातील पिंपरखेड, काठापूर, पंचतळे, जांबूतसह परिसरातील गावांमध्ये पिस्तूलाचा धाक दाखवून, इतर घातक हत्यारे व शस्त्र बाळगून, प्राणघातक हल्ला करीत दहशत निर्माण करणाऱ्या व या दहशतीखाली खंडणी गोळा करणाऱ्या खंडणीखोरांच्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने शिरूर पोलिसांच्या मदतीने मुसक्या आवळल्या.

या टोळीकडून नऊ जीवंत काडतूसासह पाच गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. अंकुर महादेव पाबळे (वय २६), ज्ञानेश्वर श्रीकांत पाबळे (वय २५, दोघे रा. कावळ पिंपरी), विशाल उर्फ अण्णा शिवाजी माकर (वय २३, रा. ढोकसांगवी), दिलीप रामा आटोळे (वय ४५, रा. दुडेवस्ती, जांबूत) व नीलेश बबन पळसकर (वय ३५, रा. जांबूत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ते सर्व पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील असून, या टोळीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील व बेट भागातील काही गावांत शस्त्रांच्या, पिस्तुलाच्या धाकाने त्यांनी दहशत माजवली होती.

छोटे व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, परप्रांतिय ठेकेदार यांच्याकडून त्यांनी पिस्तुलाच्या धाकाने खंडणी गोळा केल्याच्या; तसेच बेदम मारहाण केल्याच्या तक्रारी असून, त्याबाबत पोलिस पथक सखोल चौकशी करीत आहे.

या टोळीतील काहींनी लियाकत नूरइस्लाम मंडल (वय ५४, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव, जि. पुणे) या बांधकाम व्यावसायिकाचे २ सप्टेंबर रोजी काठापूर गावच्या हद्दीत अपहरण केले. मारहाण करून मोटारीत बसविले.

निर्जन स्थळी नेऊन त्यांच्याजवळील मोबाईल, पाकीट, पाच हजार रूपये काढून घेतले. 'फाकटे परिसरात व्यवसाय करायचा असेल तर आमच्याकडून वाळू घ्यायची व आम्हाला दहा लाख रूपये द्यावे लागतील', असा दम दिला. मात्र, मंडल यांनी नकार देताच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला.

टोळीतील एकाने त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावून, 'एक लाख रूपये लगेच दे नाहीतर तुला खल्लास करतो' असा दम दिल्याने मंडल याने मुलाशी संपर्क साधून या टोळीला एक लाख रूपये दिल्यानंतर त्यांना सोडून दिले.

त्यांनी शिरूर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिल्याने पोलिसांनी अपहरणकर्त्यांची नावे निष्पन्न करून त्यांच्याविरूद्ध दहशत निर्माण करून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी व खंडणी वसूलीप्रकरणी गुन्हा दाखल केला.

जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी या प्रकाराची व खंडणीखोरांच्या दहशतीची गंभीर दखल घेत त्यांच्या मुसक्या आवळण्याबाबत व त्यांच्या गैरधंद्यांची समांतर चौकशी करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर व शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे व अभिजीत पवार, पोलिस हवालदार तुषार पंदारे,

राजू मोमीन, अतुल डेरे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, विजय कांचन, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, हेमंत विरोळे, धीरज जाधव, समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके, जी. एन. देशमाने, नितीन सुद्रीक, बाळासाहेब भवर, नाथसाहेब जगताप,

विनोद मोरे, नीतेश थोरात, अर्जून भालसिंग, रघुनाथ हाळनोर, गणेश देशमुख, राजेंद्र गोपाळे या पथकासह खंडणीखोरांचा ठावठिकाणा शोधून काढला. ते कोरेगाव भीमा येथे येणार असून, तेथून मध्यप्रदेशात पळून जाणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून पकडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT