Pasalkar Chowk Traffic Sakal
पुणे

Traffic Issue : अतिक्रमणांनी घोटला रस्त्यांचा गळा; गंगाधाम चौक रस्त्याला वाहतूक कोंडीचा फास

रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, पावसामुळे पडलेले खड्डे आदी कारणांमुळे गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रस्त्याला वाहतूक कोंडीने घेरले आहे.

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज - रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, पावसामुळे पडलेले खड्डे आदी कारणांमुळे गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रस्त्याला वाहतूक कोंडीने घेरले आहे. वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरून मार्केट यार्डकडे जाणारी वाहने, पुणे शहरातून दक्षिण पुण्यात जाण्यासाठी तसेच सासवड, कात्रज, कोंढवा-येवलेवाडी आदी भागात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो.

रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने वाहतुक कोंडीला आमंत्रणच मिळते. विशेषतः आईमाता मंदिर परिसर आणि पासलकर (व्हीआयआयटी) चौकात मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येते. त्याचा फटका शांतीनगर, गोकुळनगर, सुखसागरनगर, साईनगर, टिळेकरनगर, कोंढवा-येवलेवाडी आदी भागातील रहिवाशांना बसतो.

बिबवेवाडी हद्दीत हा रस्ता असून त्याचा भुर्दंड कोंढव्यातील नागरिकांना अधिक बसतो. दोन लोकसभा आणि तीन विधानसभा मतदार संघाच्या हद्दीवर हा रस्ता असूनही एकाही लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याची खंत नागरिकांत आहे.

पासलकर (व्हीआयआयटी) चौक सर्वाधिक धोकादायक

या चौकाला कोंढव्याचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळख आहे. महापालिकेच्या नकाशावर २४ मीटरचा रस्ता दाखविण्यात येत आहे. अस्तित्वात मात्र ७ मीटरही नाही. दोन वाहनांनी एकाचवेळी ये-जा करणे म्हणजे कसरतीचे काम असते.

याठिकाणी शाळा असून साधारणतः १५०० ते २००० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांनाही या त्रासाला सामोरे जावे लागते. मध्येच विजेचे खांब असल्यानेही मोठा अडथळा निर्माण होतो. जवळपास २५० मीटर रस्ता हा अरुंद असून याठिकाणी वाहने अडकत असल्याचे दिसून येते.

प्रतिक्रिया

या रस्त्यावरून प्रवास करणे कसरतीचे काम झाले असून प्रवाससाठी अधिकचा अर्धा तास हातात ठेवून बाहेर पडावे लागते. तरच आपण इच्छितस्थळी योग्यवेळी पोहोचू शकतो. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देत रस्त्याची दुरुस्ती आणि रुंदीकरण करावे ही आमची मागणी आहे.

- अभिषेक पारधी, स्थानिक नागिरक

अरुंद रस्त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. हे लक्षात घेऊन अतिरिक्त आयुक्तांनी रस्ता रुंदीकरणासाठी जागामालकांशी संवाद साधला आहे. याबाबत जागामालक सकारात्मक आहेत. त्यासंदर्भात नोटीसाही देण्यात आल्या असून येणाऱ्या काळात साधारणतः आणखी ७ ते ८ मीटर जागा रस्त्यासाठी उपलब्ध होईल. तसेच, याठिकाणी असलेली झाडे आणि विजेचे खांब हटविण्यासाठीही प्रक्रिया सुरु आहे.

- सुशिल मोहिते, शाखा अभियंता, पथ विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT