Swachh organisation Sakal
पुणे

‘स्वच्छ’चे कचरा वेचक पुण्यात आंदोलनाच्या पावित्र्यात

पुणे - शहरातील कचरा संकलन करणाऱ्या ‘स्वच्छ’ संस्थेच्या कचरा वेचकांना पाच वर्षे मुदतवाढ देण्याएवजी खासगी कंत्राटदारांचा प्रस्तावावर महापालिका विचार करीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील (Pune) कचरा संकलन करणाऱ्या ‘स्वच्छ’ संस्थेच्या (Swachh organisation) कचरा वेचकांना पाच वर्षे मुदतवाढ देण्याएवजी खासगी कंत्राटदारांचा प्रस्तावावर महापालिका (Municipal) विचार करीत आहे. त्यामुळे ‘स्वच्छ’च्‍या सुमारे ३ हजार ५०० कचरा वेचकांनी सोमवारपासून काळ्या फिती (Black Ribbon) लावून काम करण्यास प्रारंभ केला. शहरात गेल्या सहा वर्षांपासून घरोघरचा कचरा संकलीत करणाऱ्या कचरा वेचकांना महापालिकेने दिलासा न दिल्यास तीव्र आंदोलन (Agitation) करण्याचा इशारा ‘स्वच्छ’ संस्थेने दिला आहे. (Garbage collectors of Swachh in the sanctity of agitation in Pune)

स्वच्छकडून शहरात गेल्या सहा वर्षांपासून कचरा संकलीत केला जातो. त्यांच्याकडून दररोज सुमारे १४०० टन कचरा उचलला जातो. त्यातील २०० टन कचरा पुर्नवापर प्रक्रियेसाठी दिला जातो तर, उर्वरित १२०० टन कचऱ्यावर विविध प्रकल्पांत प्रक्रिया होते. ‘स्वच्छ’ला महापालिकेने कचरा संकलनासाठी दिलेली मुदत ३१ डिसेंबर २०२० रोजी संपली. त्यानंतर ‘स्वच्छ’ला मुदतवाढ दिली जाईल, असे महापालिकेने सांगितले होते. तसेच त्या बाबत पदाधिकाऱ्यांनी आश्वासनही दिले होते. तसेच ११५ नगरसेवक आणि ३० लाखांहून अधिक पुणेकरांनी स्वच्छला मुदतवाढ देण्याच्या बाजूने मत व्यक्त केले आहे. मात्र, कचरा संकलनासाठी काही खासगी ठेकेदार नियुक्त करण्याचा प्रयत्न काही घटक महापालिकेत करीत आहेत. त्यामुळे स्वच्छला गेल्या सहा महिन्यांत प्रत्येकी दोन महिन्यांची तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर स्वच्छच्या कचरा वेचकांनी सोमवारपासून काळ्या फिती लावून काम करण्याचे आंदोलन सुरू केले. महापालिकेने ठरवून दिलेल्या दरांनुसार कचरा वेचक नागरिकांकडून कचरा गोळा करण्याचे शुल्क घेतात. त्यावर कचरा वेचकांची उपजिविका अवलंबून आहे.

'३० लाखांहून अधिक नागरिकांचा आणि ११५ नगरसेवकांचा लेखी पाठिंबा जर आमच्या कामाचे यश अधोरेखित करत नसेल तर महानगरपालिकेला कचरा व्यवस्थापनातून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे आम्हाला समजत नाही.'

- विद्या नाईकनवरे, कचरा वेचक प्रतिनिधी, धनकवडी

'कोव्हीडच्या पहिल्या लाटेदरम्यान आम्हाला आश्वासित केलेला प्रोत्साहन भत्ता, महानगरपालिकेने मान्य केलेला आयुर्विमा, PPE, काम करण्याचे साहित्य (गाड्या, बोध, बकेट) यापैकी काहीही आमच्यापर्यंत पोहचत नाही, पण आमच्या उपजीविकेच्या कंत्राटीकरणाबद्दलच्या चर्चांना वेग येतो हे चीड आणणारे आहे. कोव्हीडमुळे काम करताना आमच्या भगिनींचे निधन झाले, तरीही आम्ही न थांबता काम सुरु ठेवले. याची जाणीव तरी महानगरपालिकेला आहे का?'

- राणी शिवशरण, कचरा वेचक प्रतिनिधी, हडपसर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT