पुणे - पुणे महापालिकेत नुकत्याच समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अडवणूक केली जात असल्याची तक्रार नऱ्हे येथील नागरिकांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
कचरा उचलण्याचे पैसे न दिल्यास उद्यापासून कचरा उचलला जाणार नाही, अशा धमक्या नऱ्हेतील नागरिकांना दिल्या जात आहेत. धमक्या देणारी एजन्सी कागदपत्रे दाखवत नाहीत. काही सोसायट्यांमधून कचरा वाहून नेण्याचे बंद केले असल्याची तक्रार नऱ्हे गावातील ओयासीस, समृद्धी सोसायटी, जी. के. सोसायटी, विलोचन रेसिडेन्सी आदी सोसायट्यांमधील नागरिकांनी आयुक्तांकडे केली आहे.
नऱ्हे गावात पूर्वीपासून कचरा उचलण्यासाठी त्या-त्या सोसायटी-अपार्टमेंटने लोकांची नेमणूक केलेली आहे. विशेष म्हणजे महापालिकेत समावेश होऊन अजून एक महिनाही पूर्ण झालेला नाही. त्यातच या स्वयंघोषित एजन्सीमुळे डबल पैसे देण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. त्यामुळे आम्ही सर्व नागरिक हतबल झालो आहोत, याबाबत आयुक्तांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी सोसायट्यांच्या वतीने डॉ. विक्रम गायकवाड यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.