पिंपरी - रस्त्यालगत टाकला जात असलेला राडारोडा. 
पुणे

शहरातील रस्त्यांच्या कडेला राडारोडा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरात एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना, दुसरीकडे रस्त्यांलगत व मोकळ्या जागांमध्ये राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील काही मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही असे चित्र दिसत असून, ट्रॅक्‍टर, डंपर अशा वाहनांमधून राडारोडा टाकताना उडणाऱ्या धुळीचा पादचारी व दुचाकीस्वारांना सर्वाधिक त्रास होत आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार शहरात घनकचरा व्यवस्थापन नियम लागू झाले आहेत. त्याअंतर्गत महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. 

रस्त्यांवर राडारोडा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, या कारवाईला न जुमानता अनेक जण अद्यापही बांधकामाचा राडारोडा ट्रॅक्‍टर, डंपर, टेम्पो अशा वाहनांतून आणून जागा मिळेल तेथे टाकत आहेत. वाहनांमधून राडारोडा टाकताना उडणारी धूळ पादचारी व दुचाकीस्वारांना त्रासदायक ठरत आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार रस्त्यावर घाण करणे, राडारोडा टाकणे गुन्हा आहे. त्यानुसार शहरातील रस्त्यांवर घाण करणारे व राडारोडा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. 
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

येथे टाकला जातोय राडारोडा
 पिंपळे निलख- बाणेर रस्त्यालगत मुळा नदीलगतचा परिसर
 पिंपरीतील अजमेरा कॉलनी डब्ल्यू सेक्‍टर ते मोरवाडी कोर्ट रस्ता
 आकुर्डी स्टेशन ते चिंचवड स्टेशन लोहमार्गालगतचा नवीन रस्ता
 पुणे-नाशिक महामार्गालगत नाशिक फाटा ते मोशीदरम्यानचा पट्टा
 भोसरी वखार महामंडळ ते वडमुखवाडी अलंकापुरम रस्ता
 शंकरवाडी- कासारवाडी ते सुदर्शननगर पवना नदीलगतचा रस्ता
 भोसरी व मोशी प्राधिकरणातील अंतर्गत रस्ते
 प्राधिकरणातील निगडी- भोसरी स्पाइन रोडचा सेवारस्ता
 भोसरी- नेहरुनगर- पिंपरी रस्ता
 एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

Stock Market: शेअर बाजारात तेजी कधी येणार? मोतीलाल ओसवालने सांगितले बाजाराचे भविष्य

Big Updates: विराट कोहली, लोकेश राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

कधी स्पॉटबॉयचं काम तर कधी अभिनेत्रींचे कपडे इस्त्री केले ; बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीचा डोळ्यात पाणी आणणारा स्ट्रगल

SCROLL FOR NEXT