गरुडझेप शिवज्योत मोहीम  sakal
पुणे

गरुडझेप शिवज्योत मोहीम पुण्यात दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगऱ्याहून झालेल्या सुटकेच्या स्मरणार्थ तेराशे किलोमीटरचा पायी पल्ला पार

विठ्ठल तांबे

धायरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १७ ऑगस्ट १६६६ रोजी झालेल्या आग्राहून सुटकेच्या स्मरणार्थ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे चौदावे वंशज ऍडव्होकेट मारुतीआबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली आग्रा ते राजगड गरुडझेप मोहीम राबविण्यात आली आहे. दरम्यान,१७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता आगऱ्यातील असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करून व स्थानिक आमदार योगेंद्र उपाध्याय व इतिहास संशोधक डॉ. सुमन आनंद यांच्या हस्ते राजगडाच्या मातीचे पूजन व शिवज्योत प्रज्वलित करत गरुडझेप मोहिमेचा प्रारंभ झाला. त्यानंतर,२४ ऑगस्ट रोजी शिवज्योत घेऊन मावळे महाराष्ट्रभूमीत दाखल झाले होते. उत्तर महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत मावळे २९ ऑगस्टला राजगडावर पोहचणार आहेत.ही मोहीम शिवज्योत घेऊन आज सकाळी पुण्यात दाखल झाली. पुण्यासह महाराष्ट्रभरातील जनतेने या मोहिमेतील सर्व मावळ्यांचे मनापासून आदरतिथ्य केले.

महाराजांच्या आगऱ्याहून झालेल्या सुटकेला ३५५ वर्ष पूर्ण होत आहेत.साधारण तेराशे किलोमीटरचे अंतर पार करून उद्या (२९) गरुडझेप मोहीम राजगडावर सकाळी आठ वाजता पोहचणार आहे. नंतर, अभिषेक व स्वागत समारंभ आणि नेत्रचिकित्सा शिबीर होणार असून, अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमचा शेवट होणार आहे. या मोहिमेत सरनौबत पिलाजी गोळे यांचे चौदावे वंशज ऍडव्होकेट मारुतीआबा गोळे, कान्होजी जेधे यांचे वंशज दिग्विजय जेधे, जाधव घराण्याचे वंशज गणेश जाधव व तानाजी मालुसरे यांचे वंशज महेश मालुसरे यांचेसह एकूण ७२ मावळे या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

यावेळी पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव धायरी येथे अनेकांनी गरुड झेप मोहोमीचे स्वागत केले यावेळी काका चव्हाण, विकास दांगट ,चंद्रशेखर पोकळे ,मारुती कामथे,तसेच परिसरातील अनेक माय माऊलीनी ढोल ताशा ,हार फुले असे जंगी वाजत गाजत मोहीमेचे स्वागत केले.

"हिंदवी स्वराज्य घडवीत असताना नव्यांणव दिवस आग्रा  येथे औरंगजेबच्या कैद्यात राहून नैराश्यात नाकारून राजगडावर आले तसेच तरुणांनी देखील अपयश आले तरी शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन आपयशाला सामोरे गेले पाहिजे.'३५५ वर्ष होऊनही छत्रपती शिवाजी महाराज यांचा ढगधगता इतिहास मावळ्यांनी जागवीला आहे."

- सरनौबत मारुती आबा गोळे- गरुड झेप मोहीम -संस्थापक अध्यक्ष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT