Gautami Patil offensive audio tape accused arrested police crime pune SAKAL
पुणे

Gautami Patil : गौतमी पाटीलची आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रसारीत करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या नावे समाजमाध्यमात बनावट खाते उघडून त्यावर आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रसारित करणाऱ्या तरुणास विमानतळ पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून अटक केली. याबरोबरच एका विधीसंघर्षीत मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आयुष अमृत कणसे (वय 21, रा. भरतगाववाडी, सातारा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच एका 17 वर्षीय ताब्यात घेण्यात आले आहे. लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलचे समाजमाध्यमावर बनावट खाते उघडून तिची ध्वनीचित्रफित प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपुर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणी 25 फेब्रुवारी रोजी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास विमानतफ पोलिस करीत होते. तांत्रिक तपासात आयुष कणसे आणि त्याच्या साथीदाराने गौतमी पाटीलचे समाजमाध्यमावर बनावट खाते उघडून आक्षेपार्ह ध्वनीचित्रफित प्रसारित केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगीता माळी, अविनाश शेवाळे, किरण खुडे, रेहान पठाण, अंकुश जोगदंड, दादासाहेब बर्डे, आस्मा शेख, रेणुका भोगावडे, प्रियंका शिंदे यांच्या पथकाने हि कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

SCROLL FOR NEXT