State Agricultural Marketing Board Sakal
पुणे

द्राक्षे, आले, लिंबू आणि आंबा आयातीसाठी जर्मनी उत्सुक

पणन मंडळाच्या प्रयत्नांना यश

प्रवीण डोके

पुणे - जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून प्रथमच आयात केलेल्या अंजिराच्या गोडीने जर्मनीतील ग्राहकांनी उत्स्फूर्त दाद दिली असून, महाराष्ट्रातील आले, लिंबू, द्राक्षे आणि आंबा आयातीसाठी जर्मनीतील कंपनी उत्सुक झालेली आहे. त्यामुळे राज्यातील शेतमाल निर्यातीच्या वाढीसाठी राज्य कृषी पणन मंडळ करीत असलेल्या प्रयत्नांना यश येत आहे.

भारत व युरोपियन देशांमधील राष्ट्रीय व्यापार संबंध दृढ करण्याच्या अनुषंगाने जर्मनी येथील डॉन लिमन कंपनीचे प्रतिनिधी अँड्रियास शिंडलर व पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्यात नुकतीच संयुक्त चर्चा झाली. यामध्ये महाराष्ट्रातील हापूस आंबा व केशर आंबा युरोपियन देशांस व अमेरिका येथे आयातीबाबत चर्चा केली. तसेच आंब्याव्यतिरीक्त इतर माल केळी, मिरची, डाळिंब, स्ट्रॉबेरी भारतातून पाठवता येथील का याबाबतही चर्चा करण्यात आली. पवार यांनी युरोपियन देशांना महाराष्ट्रातील कृषिमाल निर्यातीकरीता वाव असल्याचे सांगून निर्यातीकरीता पणन मंडळ पूर्ण सहकार्य करेल असे सांगिलते. डॉन लिमन कंपनीचे व्यवस्थापक मधु कल्यपुरा मुनीकृष्णप्पा यांनी महाराष्ट्रातून चांगल्या प्रतिचे २५० ग्रॅम वरील आले (अद्रक) मिळाल्यास तेही निर्यात करणेबाबत तयारी दर्शवली.

पवार यांनी पणन मंडळाच्या निर्यातविषयक पायाभुत सुविधा जसे वाशी येथील विकीरण सुविधा केंद्र, व्हेपर हीट ट्रीटमेंट व भाजीपाला प्रक्रिया केंद्र येथून अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड व युरोप येथे होत असलेल्या निर्यातीची माहिती दिली. केंद्र सरकारच्या कृषि निर्यात धोरणाच्या आधारे महाराष्ट्र राज्याचे कृषि निर्यात धोरण तयार करण्यात आले असून कृषि निर्यात धोरणामध्ये समाविष्ट करण्यात येत असलेले क्लस्टर्स आणि त्याअंतर्गत प्रस्तावित असलेली विविध कामे याबद्दल चर्चा करण्यात आली. या वेळी कंपनीचे बंगळु येथील प्रतिनिधी मधु कल्यपुरा मुनिकृष्णाप्पा, पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रोहन उरसळ, पणन मंडळाचे निर्यात व्यवस्थापक शैलेश जाधव, जितेंद्र जगताप, विराज पाटील हे अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील विवीध कृषिमालाकरिता नवनवीन बाजारपेठांचा शोध घेणे व नवनवीन कृषिमालाची निर्यातवृद्धीकरणेबाबत महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ सदैव प्रयत्नशील असते. युरोपसारख्या लांब अंतरावरील बाज़ारपठेमध्ये नवीन कृषिमाल निर्यात करीत असतांना सुरवातीस त्याचा प्रोटॉकॉल अंतिम करावा लागतो. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व संस्था घटकांचा समन्वय घडवून आणणे महत्वपुर्ण असते.

- सुनिल पवार, कार्यकारी संचालक, राज्य कृषी पणन मंडळ.

अंजीरास सकारात्मक प्रतिसाद

गेल्या महिन्यात कृषि पणन मंडळाच्या सहाय्याने प्रायोगिक जर्मनीत अंजीरास आयात केले होते. याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पणन मंडळाच्या सहकार्याने ज्या कृषिमालास युरोपियन देशांत आणि अमेरिका येथे निर्यातीच्या संधी आहेत. त्या कृषिमालाचे निर्यातीबाबत कामकाज करण्याची तयारी असल्याचे डॉन लिमन कंपनीचे प्रतिनिधी अँड्रियास शिंडलर सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT