इमारतीच्या उदघाटन प्रसंगी कोल्हे आणि आढळराव यांच्यात श्रेयवादाची लढाई  sakaal
पुणे

इमारतीच्या उदघाटन प्रसंगी कोल्हे आणि आढळराव यांच्यात श्रेयवादाची लढाई

चंद्रकांत घोडेकर ः सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे पंचायत समितीच्या नविन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समोर खासदार डॉ. अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प व पुणे नाशिक महामार्गाचा श्रेयवाद पुन्हा रंगला. तसेच आढळराव यांनी आपण सांगितलेल्या विकास कामांना महाविकास आघाडी सरकार टोलवा टोलवी करते असा जाहिर आरोप करुन याबाबत अजित पवार यांनी समन्वय घडवावा अशी मागणी भाषणात केली. तर अमोल कोल्हे यांनी शिरुर लोकसभा मतदार संघात अजित पवार, वळसे पाटील यांच्यामुळे वेगाने विकास होत असल्याचे भाषणात सांगितले. लोकसभा निवडणूकीनंतर अजित पवार, दिलिप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रथमच एकाच व्यासपीठावर येऊन महाविकास आघाडी सरकारचे एकीचे दर्शन घडविले.

खेड येथे पंचायत समितीच्या इमारत बांधकामाच्या जागेवरुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार दिलीप मोहिते व आढळराव यांचा अजूनही वाद संपलेला नाही. याचा भाषणात उल्लेख करुन आढळराव म्हणाले, माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांनी प्रयत्नपूर्वक इमारत बांधकामासाठी निधी मंजूर केला. याच धावपळीत त्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. इमारतीच्या जागेवरुन राजकारण न करता पालकमंत्री म्हणून अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांनी समोरासमोर येऊन शहानिशा करावी आमचे चुकीचे असेल तर आम्ही माघार घेऊ अशी भूमिका मांडली. शिरुर ,जुन्नर, आंबेगाव मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही वाद नाही. परंतू खेडमध्ये वादाच्या घटना सतत घडत असतात. यावरही विचार करण्याचे आवाहन त्यांनी आजित पवार यांना केले.

15 वर्षे परिश्रम घेऊनच रेल्वे प्रकल्प पूर्णत्वात येत आहे. 25-15 निधीतून 4 कोटी रुपयांचा निधी अजित पवार यांनी द्यावा. याला वळसे पाटील विरोध करणार नाहीत. असे भाषणात सांगितले. यावर अजितदादा यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आधीच्या सरकारने 25-15 निधी रद्द केला त्यामुळे आढळराव यांचाही तो निधी रद्द झाला. यावेळी अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे राज्यात तिनचार ठिकाणी असे श्रेय वादाचे राजकारण सुरु आहे. याबाबत आपण मुख्यमत्री उध्दव ठाकरे, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करु.

नाशिक पुणे रेल्वे प्रकल्पाबाबत आढळराव यांनी पुन्हा एकदा भाषणात केलेल्या कामाचा पाठपुराव्याची माहिती दिली. तसेच पुणे नाशिक महामार्ग व जुन्नर येथील पर्यटनासाठी निधी द्यावा अशी मागणी केली . विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनीही आपल्या भाषणात पुणे नाशिक प्रकल्पाबाबत अजित पवार यांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख करुन प्रकल्प लवकरच मार्गी लागेल असे सांगितले. शिरुर लोकसभा मतदार संघात 8 हजार 200 कोटींची रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगितले.

तसेच मेडीसिटी या सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलसाठी लवकरच प्रकल्प आराखडा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना सादर करणार असल्याचे सांगितले . तसेच येथील 138 किलोमिटर रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गाकडे वर्गीकरण करन्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सर्पदंश उपचार सेंटर सी.एस.आर. फंडातून उभे करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT