देश गमावलाय, दुःख कोणत्या शब्दांत सांगू  sakal
पुणे

देश गमावलाय, दुःख कोणत्या शब्दांत सांगू

अफगाणी विद्यार्थ्यांची भावना; कुटुंबीयांच्या काळजीने चिंताग्रस्त

सम्राट कदम

पुणे : मध्य अफगाणिस्तानातील (Afghanistan) हरीरूद नदीच्या किनाऱ्यावर वसलेला प्रांत म्हणजे ‘घोर’! एकेकाळी हिंदू आणि बौद्ध संस्कृती यांचं महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या या प्रांतातून चार वर्षांपूर्वी अझीझा सरवारी नावाची युवती पुण्यात (pune) शिकायला येते. भारतातील (india) शिक्षण संपल्यानंतर स्वतःसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी तिने अनेक स्वप्न रंगवले. पण रविवारच्या (ता. १५) रात्री काबूलमध्ये जे काही घडले, त्यामध्ये तिने स्वतःचे स्वप्नंच नव्हे तर अस्तित्वाचीही राखरांगोळी होताना पाहिली. ‘सकाळ’शी बोलताना ती म्हणाली,‘‘आज माझा देशच अस्तित्वात नाही. याहून मोठे दुःख कोणते असेल, कोणत्या शब्दात सांगू मी.’’

आपली हतबलता शब्दातून प्रकट करणारी अझीझा एकमेव विद्यार्थी नाही. पुण्यासह देशभरात असे असंख्य अफगाणी विद्यार्थी शिक्षणासाठी आले आहे. त्यातील सर्व आता मानसिक आणि आर्थिक समस्यांना तोंड देत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागात (पुम्बा) अझीझा शिकत आहे. तिच्या घरी आई, वडील, बहिण आणि भाऊ असा परिवार आहे. दूरचित्रवाणी किंवा समाजमाध्यमांवर दिसणाऱ्या दृश्यांनी केवळ त्यांना विचलित केले नाही, तर कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या प्रश्नाने भयभीतही केले आहे. अफगणिस्तानमध्ये सुका मेवा आणि केशरचे उत्पादन वाढावे, त्यातून देशाची प्रगती व्हावी, यासाठी वरदक प्रांतातून फरझाना उमर्सी पुण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून ती व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेत आहे. ती म्हणाली,‘‘आमचा देशच आता अस्तित्वात राहिला नाही. तालिबान्यांनी जे काय केले, ते भयंकर आहे. मला तर काय करावे, काहीच समजत नाहीये. माझी भावंडे आणि नातेवाईक काबूलमध्ये अडकले आहेत. त्यांच्याशी संपर्क केला तर त्यांचाच जीव धोक्यात जाईल.’’ पुणे शहरात विविध शिक्षणसंस्थांमध्ये अनेक विद्यार्थी सध्या शिकत असून, त्यांना येत्या काळात अनेक अडचणींना सामारे जावे लागणार आहे.

अफगाणी विद्यार्थ्यांसमोरील अडचणी..

कुटुंबीयांशी आठवडाभरापासून कोणतेच बोलणे नाही

अनेकांच्या व्हिसाची मुदत वाढवणे गरजेचे

घरच्यांशी संपर्क नसल्यामुळे आर्थिक समस्या

दिशाहीन भविष्य असल्यामुळे मार्गदर्शनाची आणि दिलासा देण्याची आवश्यकता

तालिबानमुळे आमचा देश २० वर्षे मागे गेला आहे. महिला सबलीकरण, उद्योग, शिक्षण आदी विकासाच्या संकल्पनेला तालिबानचा विरोध आहे. तालिबान्यांचा भारतालाही विरोध आहे. आता जर पुन्हा घरी परतले तर तालिबानी मला जिवंत ठेवतील का, हा मोठा प्रश्न आहे.

- फरजाना उमरसी, अफगाणी विद्यार्थिनी

घरी फोन केला तर तालिबानी तो ट्रॅक करतील. मी भारतात असल्याचे त्यांना कळाल्यास ते माझ्या घरच्यांना त्रास देतील. त्यामुळे मी घरीसुद्धा फोन करत नाही. घरच्यांशी शेवटचे बोलणे आम्ही आठवडाभरापूर्वी केले होते.

- अझीझा सरवारी, अफगाणी विद्यार्थिनी

अफगाणी विद्यार्थ्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाचे जे निर्देश येतील, त्यांची अंमलबजावणी आम्ही करू. विद्यापीठाच्या आवारात सध्या राहत असलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांची काळजी आम्ही घेत आहोत. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.

- डॉ. विजय खरे, संचालक, आंतरराष्ट्रीय केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुण्यातील अफगाणी विद्यार्थ्यांची संख्या

शैक्षणिक वर्ष : विद्यार्थी

२०१८-१९ : १८३

२०१९-२० : १५४

२०२०- २१ : २१७ (ऑनलाइन), प्रत्यक्ष १०

२०२१-२२ : ५९८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT