girl drowned in Neera river near Bhatghar dam police bhor pune sakal
पुणे

Pune News : भाटघर धरणाजवळ नीरा नदीच्या पाण्यात तरूणी बुडाली

सकाळ वृत्तसेवा

भोर(पुणे) : येथील भाटघर धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला असलेल्या वेळवंडी व नीरा नदीच्या संगमाजवळ खटाव (जि.सातारा) येथील तरूणी बुडाली. सोमवारी (ता.३) सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे जवान तिच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी निगुडघर (ता. भोर) येथील तरुण आणि संबंधीत तरुणी हे दोघे भाटघर धरणाजवळ फिरण्यासाठी आले होते. धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला पॉवर हाऊसच्या जवळ नदीच्या कडेला पाण्यात पाय सोडून दोघेही बसले होते. त्यावेळी मुलीचा अचानक तोल जाऊन ती पाण्यात पडली.

धरणातून पाणी सोडले असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती वाहून गेली. तिच्यासोबत असलेल्या तरुणाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यास यश आले नाही. संबंधीत तरुणाने भोर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना खबर दिली. भाटघर धरणाशेजारील घटनास्थळ हे शिरवळ (ता.खंडाळा, जि.सातारा) यांच्या हद्दीत येत असल्यामुळे भोर पोलिसांनी शिरवळ पोलिसांना कळविले. त्यानंतर भोरचे पोलिस, भोरमधील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे जवान हे शिरवळ पोलिसांसमवेत संबंधीत तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dasara Melava Rally: प्रचार तोफांची आज पहिली सलामी; जाणून घ्या कोणत्या नेत्याचा कुठं होणार दसरा मेळावा

Bagmati Express Accident: मोठा रेल्वे अपघात! वेग 75 किमी, बागमती एक्स्प्रेस मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये घुसली; 19 प्रवासी जखमी

Dussehra Melava 2024 Live Updates: आरएसएसच्या शस्त्रपूजन कार्यक्रमात इस्रोच्या दोन माजी प्रमुखांची उपस्थिती

अग्रलेख : अपने अपने रावण!

Dussehra 2024 Wishes: 'वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय..' दसऱ्याच्या प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT