Crime Sakal
पुणे

प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकाराने प्रेयसीचा गळा दाबुन केला खुन

शरीराचे तुकडे करून टाकले पिरंगुट-मुठा घाटात, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रेयसीकडून सतत होणाऱ्या त्रासाला आणि सातत्याने होणाऱ्या भांडणाला कंटाळून प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून खुन केला. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून पिररंगुट व मुठा घाटामध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बारा दिवसात या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीस अटक केली. हि घटना 12 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता नारायण पेठेत घडली. (Pune News)

रोझिना रियाज पानसरे ऊर्फ कविता चौधरी (वय 30, रा. बुधवार पेठ) असे खुन झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर हनुमंत अशोक शिंदे (वय 40, रा. बुधवार पेठ) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी शिंदे विरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत शिंदे हा मोबाईल दुरुस्तीचे काम करतो. त्याचे बुधवार पेठेत दुकान आहे. तर रोझिना ही बुधवार पेठेत देहविक्री करते. त्यातूनच दोघांची ओळख झाली. शिंदे हा विवाहीत असतानाही त्याने तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले होते. शिंदेनेच रोझिनाला नारायण पेठेत एक सदनिका भाड्याने घेऊन दिली होती. रोझिना हि शिंदेला त्याच्यासमवेत राहण्यास जबरदस्ती करीत होती, त्याला घरी जाऊ न देता त्याच्याशी सातत्याने भांडणे करीत होती. त्यातुनही ती दररोज देहविक्री करण्यासाठी जात असल्याने त्या दोघांमध्ये वाद होत होते. 12 ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास शिंदे घरी येत नसल्याच्या कारणावरुन त्यांच्यात भांडणे झाली. त्यानंतर त्याने तिचा गळा आवळून खुन केला.

अशी लावली मृतदेहाची विल्हेवाट

या घटनेनंतर शिंदे सदनिका बंद करून अक्कलकोट येथे गेला. तेथून दोन दिवसांनी परतल्यानंतर तो पुन्हा सदनिकेवर गेला. 14 ऑगस्ट रोजी त्याने रोझिनाच्या शरिराचे तुकडे करून एका ताडपत्रीच्या पिशवीत ठेवून ते टेम्पोमध्ये भरले. त्यानंतर ताडपत्रीची पिशवी भुगाव ते लवासा घाटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. या घटनेनंतर तो त्याचे काम नियमीतपणे करीत होता. दरम्यान, बुधवार पेठेतील एक देहविक्री करणारी महिला काही दिवसांपासून बेपत्ता होती, त्याबाबतची तक्रार फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल होती. याबाबतची खबर गुन्हे शाखेच्या पोलिसास मिळाली. त्यानुसार, पोलिस शिंदेच्या मागावर होते. त्यांनी पाळत ठेवून शिंदे यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT