Golden opportunity to become Indian Army officer NCC Special entry pune  Google
पुणे

पुणे : एनसीसी विशेष प्रवेश प्रक्रियेला सुरवात

सैन्यदलाच्या वतीने शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) ५२ व्या तुकडीसाठी विशेष प्रवेश योजनेची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्याची सुवर्ण संधी तरुण-तरुणींसाठी उपलब्ध झाली आहे. सैन्यदलाच्या वतीने शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) ५२ व्या तुकडीसाठी विशेष प्रवेश योजनेची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी पुरुष व महिला हे दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात.

या प्रक्रियेमध्ये एकूण ५५ जागा असून त्यातील ५० जागा पुरुष आणि ५ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एनसीसीचे ‘सी’ सर्टिफिकेट उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभाग घेता येणार असून कोणत्याही शाखेच्या पदवीमध्ये किमान ५० टक्के गुण असणे आवश्‍यक आहे. तसेच यासाठी १९ ते २५ वर्षांपर्यंतची वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत लेखी परीक्षा नसून थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखातींद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (ओटीए) येथे ४९ आठवड्यांचे प्रशिक्षणानंतर सैन्यदलात अधिकारी म्हणून प्रवेश मिळेल.

एनसीसी विशेष प्रवेश योजनेच्या ५२ व्या तुकडीचे प्रशिक्षण ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना प्रक्रियेशी संबंधित अधिक माहिती व अर्ज भरण्यासाठी www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल. येत्या १३ एप्रिलपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मानखुर्द विधानसभेत नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT