पुणे - शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग आला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडपेक्षा पुण्यातील जास्त ज्येष्ठांनी लस घेतली असून, त्यांची संख्या २५ हजारांवर गेली आहे. देशाच्या तुलनेत १०.३ टक्के सक्रिय रुग्ण अद्याप जिल्ह्यात आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील लसीकरणाच्या घेतलेल्या माहितीच्या आधारावर हा निष्कर्ष निघाला. देशात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. त्याच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्करला लसीकरण सुरू आहे. त्याच वेळी आता ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्यांनाही यात लस देण्यात येत आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लसीकरण केंद्र ४ वरून ७१
शहरात १ मार्चपासून ज्येष्ठांचे लसीकरण सुरू झाले. त्या दिवशी शहरात फक्त चार लसीकरण केंद्रे होती. त्यात ससून रुग्णालयासह महापालिकेचे कमला नेहरू, राजीव गांधी आणि सुतार दवाखाना यांचा त्यात समावेश होता. त्या दिवशी फक्त १५४ ज्येष्ठ नागरिकांना लस देता आली. अवघ्या आठ दिवसांमध्ये या केंद्रांची संख्या ७१ पर्यंत वाढविण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. त्यात ४४ सरकारी आणि २७ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामुळे मंगळवार (ता. ८) पर्यंत शहरात ज्येष्ठांच्या लसीकरणाचा २५ हजारांचा टप्पा ओलांडला.
लसीकरणासाठी अशी करा नावनोंदणी
अत्यावश्यक कागदपत्रे
ज्येष्ठांना आणि व्याधीग्रस्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. लसीकरणाच्या या तिसऱ्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.
आधार कार्ड,
वयाचा पुरावा असलेले ओळखपत्र (जन्म दाखला, पॅन कार्ड, पारपत्र)
४५ ते ५९ वर्षे वयातील व्याधीग्रस्त नागरिकांनी नोंदणीकृत डॉक्टरांचे प्रमाणपत्र
लस घेतल्यानंतर हे होऊ शकते
(स्रोत : आरोग्य विभाग, महापालिका)
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.