लोणी काळभोर : कृषी, सहकार, उद्योग-व्यवसाय, सामाजिक, सांस्कृतिक, कामगार, साहित्यिक, कलावंत आदी विविध समाजातील घटकांसासाठी मागील पन्नास वर्षांपासून काम करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासारख्या वंदनीय व्यक्तीवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार साहेबांची तात्काळ माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपुर येथे बोलताना शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष तात्यासाहेब काळे व सरचिटणीस शंकर भोसले यांनी ही मागणी केली आहे.
याबाबत बोलताना तात्यासाहेब काळे म्हणाले, नेता कोणत्याही पक्षाचा असो, खालच्या पातळीवर टीका करणे आपली संस्कृती नाही. शरद पवार यांनी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या जडणघडणीमध्ये संरक्षण, कृषी सारख्या महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अखंडपणे ५० ते ६० वर्ष सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योग-व्यवसाय, कामगार, साहित्यिक, कलावंत आदी विविध समाजातील घटकांसाठी मोठे योगदान दिले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
देशातील व राज्यातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी अतिशय कष्ट घेतले असून त्यांच्यामुळेच आपल्या राज्यातील बहुजन समाजापासून अल्पसंख्या विविध जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने जीवन जगत आहेत. त्यांनी आपल्या राज्यात महिलांना न्याय व दीनदलितांना दलिताचा सत्तेत सहभाग असे अनेक उपक्रम हाताळून त्यांनी न्याय दिला आहे. अशा नेत्यावर खालच्या पातळीवर टीका करणे पडळकर याना शोभणारे नाही.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तात्यासाहेब काळे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी सहकारी साखर कारखाना, बँक, दूध-संस्था उभ्या करुन, ग्रामीण भागातील आर्थिक, शैक्षणिक प्रगती करण्याबरोबरच, शेतकऱ्यांच्या जीवनात संपन्नता आनली आहे. साखर उद्योगात पवार सायेबांच्या एवढा जाणकार अभ्यासू नेता नाही. हा उद्योग व कामगारही टिकला पाहिजे या भूमिकेतून साखर कारखाना कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पवार साहेब अहोरात्र कष्ट करीत असतात. अशा महान नेत्यावर सार्वजनिक आयुष्यात जण सामान्यासाठी काही केले नाही म्हणजे कृतध्नेचे लक्षण आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
काल-परवा राजकारणात आलेल्या व्यक्तीने विकासाची कोणतीही संस्था उभी न करता, केवळ समाजात दुहीची विषमता निर्माण करून आमदारकी मिळवणाऱ्या कर्तव्यशून्य गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे अतिशय घाणेरडे राजकारण आहे. असे घाणेरडे राजकारण करणाऱ्यांचे महाराष्ट्रातील साखर उद्योगातील सर्व कामगार आमदार पडळकर यांचा जाहीर निषेध करतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.