Grandmother Died After Voting her grandson in Valen gram panchayat election 
पुणे

किंमत एका मताची : नातवाला विजयी करून, आज्जीने घेतला जगाचा निरोप

गोरख माझिरे

कोळवण(पुणे) : वाळेण(ता. मुळशी) येथील वार्ड १ मध्ये विजय मुगुट साठे यांचा एक मताने विजय झाला. त्यांना १२७ तर विरोधी उमेदवार संजय चिंधु साठे यांना १२६ तर यशवंत किसन ढमाले १३ मते पडली. विजय  साठे यांना मिळालेले मोलाचे एक अविस्मरणीय असेच आहे. 

विजयी उमेदवार विजय साठे यांच्या आजी सरुबाई शंकर साठे या ११३ वर्षाच्या होत्या. मतदानाच्या दिवशी आपल्या नातवाला मतदान रुपी आशिर्वाद देऊन रात्री शेवटचा श्वास  घेतला. त्यामुळे आजीचे मत त्यांच्या विजयासाठी निर्णायक ठरले. त्यामुळे विजय मुगुट साठे यांच्या एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसू होते.

आणखी वाचा - हवेली तालुक्यातील निकाल


मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी १० वाजता मत मोजणीच्या प्रक्रियेला सुरवात झाली. एकूण 14 टेबल वर मोजणी करताना 8 फेऱ्या ठेवल्या होत्या. तहसीलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडण्यात आली. 

आणखी वाचा - मुळशी तालुक्यातील निकाल 

आजींचे वय जास्त असल्याने त्या गेल्या १५ दिवसांपासुन खुपच थकल्या होत्या. पंधरा दिवसांत कधी शेवटचा श्वास घेतील याची शाश्वती नव्हती. परंतु निवडणुकीत मतदान केल्यावर त्याच दिवशी रात्री दहाच्या दरम्यान त्या मयत झाल्या. यातुन त्यांचा जीव हा मतदानातच अडकला होता अशी चर्चा पंचक्रोषित होत आहे. 

2005 साली विजय साठे हे २७ मतांनी विजय घोषित केले होते परंतु फाॅम चुकल्याने त्यांना पराभव स्विकारावा लागला. 2010 साली साठे यांचा 1 मताने पराभव झाला. 2015 साली स्वत: विजय साठे यांनी ग्रामपंचायत बिनविरोध केली. सन २०२१ मध्ये त्यांनी गाव बिनविरोध करण्याचे ठरवले परंतु त्यांना गावाचाच विरोध झाला. 

''मी निवडुन येण्यामध्ये आजीच्या एका मताचे महत्त्व आहे. आज हा आनंदोत्सव पाहण्यासाठी माझी आजी हवी होती, माझ्या आनंदात आणखी भर पडली असती.'' 
-विजय मुगुट साठे (विजयी उमेदवार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT