Gram Panchayat Election sakal
पुणे

Gram Panchayat Election: नीरा देवघर परिसरात निवडणूक बिनविरोध करण्याकडे कल

सकाळ वृत्तसेवा

महुडे: भोर तालुक्यातील २७ सार्वत्रिक व १९ पोटनिवडणूक ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर होऊन शुक्रवार (ता.२०) उमेदवार अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत सरपंच पदासाठी ६४ तर सदस्यांसाठी २६१ उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची बुधवारी (ता. २५) ही अंतिम मुदत होती. निवडणूका लागणाऱ्या ग्रामपंचायतींचे ५ नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. मात्र, नीरा देवघर धरण भागात ग्रामपंचायतींचा बिनविरोधकडे कल दिसून येत आहे.

ग्रामपंचायतीच्या २७ सार्वत्रिक निवडणुकांमधील हिरडस मावळातील नीरा देवघर धरण परिसरातील १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायती सात सदस्यांच्या असून आठवा सरपंच जनतेतून निवडला जाणार आहे. बारा ग्रामपंचायतींपैकी पाच ठिकाणी सरपंचपदासाठी एक एक अर्ज आल्याने त्या ग्रामपंचायतीचा सरपंच बिनविरोध होणार आहे.

पर्हर खुर्द ठिकाणी सरपंच पदासाठी एकही अर्ज दाखल नाही तसेच शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये सदस्यासाठी एकही अर्ज दाखल नाही. दापकेघर, शिरवली हिमा व कोंढरी येथे सदस्यांसाठी सात अर्ज आल्याने सदस्यांची निवडणूक बिनविरोध होणार आहे (एखाद्या वार्डात जास्तीचा अर्ज दाखल नसेल तर) मात्र, सरपंच पदासाठी एक पेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याने माघारीपर्यंत या तिन्ही ग्रामपंचायत सरपंच पदाविषयी सांगता येणार नाही.

रायरीत सदस्यासाठी १२ व सरपंचपदासाठी २ तर हिर्डोशीत ९ सदस्य व ४ सरपंच पदासाठी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक लागण्याची स्थिती दिसत असली तरी माघारी नंतरच येथील चित्र स्पष्ट होणार आहे. पश्चिम भागातील महुडे खोर्यातील महुडे खुर्द येथे सदस्यांसाठी १८ व सरपंच पदासाठी दोन अर्ज, जयतपाड येथे सदस्यांसाठी १५ व सरपंचपदासाठी ४ अर्ज, कुरंजी येथे सदस्यांसाठी ६ व सरपंचपदासाठी एक तसेच कांबरे येथे सदस्यांसाठी १२ तर सरपंचपदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत.

एकंदरीत या नीरा देवघर धरण क्षेत्रातील ग्रामपंचायती बिनविरोध होण्याकडे कल जास्त असल्याचे प्रशासनाने दिलेल्या दाखल अर्जांच्या अकडेवारीवरुन दिसून येत आहे. तर पोटनिवडणूकीत १९ पैकी पश्चिम भागातील करंदी खुर्द १, मळे १ व माझगाव ४ असे तीन ग्रामपंचायतीतून फक्त ६ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. बाकी १६ ठिकाणच्या जागा रिक्तच राहणार आहे.

दरम्यान, भोर तालुक्यातील वरंधा घाट मार्गावर असणाऱ्या शिरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत फक्त सरपंचपदासाठी एकमेव अर्ज आला आहे. सदस्यपदासाठी मात्र, एकही अर्ज दाखल झाला नाही.

हिरडस मावळातील ग्रामपंचायतीत दाखल झालेले अर्ज
गाव- सदस्य - सरपंच
शिळिंब- ०७ - ०१
आशिंपी- ०७ - ०१
वारवंड- ०६- ०१
पर्हर बुद्रुक- ०७ -०१
पर्हर खुर्द - ०७ - ००
साळव - ०५ - ०१
शिरगाव- ००- ०१
दापकेघर- ०७ - ०२
रायरी - १२- ०२
शिरवली हिमा- ७ - ४
कोंढरी - ०७ - ०२
हिर्डोशी - ०९ - ०४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT