परिंचे (पुणे) : परिंचे (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि गायरान जमिनीवर अनधिकृत बांधकामाविरोधात ग्रामपंचायत सदस्य आणि सेवा निवृत्त शिक्षकाने सुरू केलेल्या उपोषणाला यश मिळाले आहे. ग्रामपंचायत सदस्याने शासनाची फसवणूक करून लाटलेल्या अनुदानाचे पैसे पुन्हा शासन तिजोरीत जमा करण्यात आले आहेत.
२०१९-२०२० साली ग्रामपंचायत सदस्य मोहन गोविंद भोसले यांनी दुधाळ जनावरे गट वाटप या योजनेअंतर्गत सदस्य पदावर असूनसुद्धा या योजनेचा लाभ घेतला होता. यामध्ये जनावर खरेदीसाठी ३० हजार रुपये आणि जनावरांच्या विम्यासाठी १८९८ रुपये असा ३१८९८ रुपये लाभ घेतला होता. याबाबत ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव यांनी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार दाखल करून मोहन भोसले यांनी शासनाची फसवणूक करून लाटलेले अनुदान वसूल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.
ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी उपोषणाला बसलेले ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव यांनी शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. पशुसंवर्धन विभागाने याबाबत भोसले यांना खुलासा मागितला असता योजनेचा अनावधानाने लाभ घेतला असून मिळालेला लाभ परत करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. उपोषणाच्या दिवशी लाभार्थी सदस्याने गट विकास अधिकारी यांच्या अनामत खाते क्रमांकावर अनुदानाची रक्कम जमा केली असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद काटवटे यांनी सांगितले.
शासकीय अनुदान भरल्यानंतर लाभार्थीवर पुढील कायदेशीर कारवाई करणे, पदाचा गैरवापर केला याबाबत निर्णय घेणे हे अधिकार पशुसंवर्धन विभागाला नसल्याने पुढील कारवाईसाठी गटविकास अधिकाऱ्यांना कळविले असल्याचे डॉ. काटवटे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.