Grandfather got angry as bjp party symbol kamal were not visible on the EVM-pune esakal
पुणे

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील पक्षांच्या खिचडीमुळे अनेक मतदारांचा गोंधळ उडाला आहे. नेमके कोणते पक्ष कुठे आहेत? असा प्रश्न निर्माण झाला असून मतदान करताना संभ्रम निर्माण होत आहे.

Sandip Kapde

आज लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात देखील मतदान होत आहे. दरम्यान पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदानादरम्यान एक आजोबा संतापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. EVM वर कमळ चिन्ह दिसल्यामुळे आजोबा संतापले.

पुण्यातील धायरी भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो आणि बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत आहे. सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढत आहेत. त्यांचे चिन्ह घड्याळ आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे उभ्या आहेत. त्यांचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची युती असल्यामुळे बारामतीत कमळ चिन्ह नाही आहे.

भाजपच्या पारंपरिक मतदारांचा असा संताप होत आहे. बारामती मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. इथं नणंद भावजय अशी लढत होत आहे. महायुती आणि महाविकासआघाडीतील असलेल्या वेगवेगळ्या पक्षांमुळे मतदारांचा मोठा गोंधळ उडत आहे.

आजोबा काय म्हणाले?

EVM वर फुल नाही. कमळ हे चिन्हच नाही. उमेदवार नाही तर त्याला आम्ही काय करणार. कमळचं चिन्ह नाहीत तर आम्ही कसं मतदान करणार आहे. मतदान करायचे आहे पण कमळ फुल कुठे आहे, असे आजोबा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT