Gujar Nimbalkarwadi ZP Dangerous Building sakal
पुणे

Zp School : जिल्हा परिषदेच्या धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण; सातवीतील मुलगी करणार उपोषण

गुजर-निंबाळकरवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला देण्यात आला.

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज - गुजर-निंबाळकरवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला देण्यात आला. मात्र, तेव्हापासून केवळ वेळकाढूपणाची भूमिका दोन्ही प्रशासनाने घेतली असून मागील चार वर्षापासून या धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांचे जीव मुठीत घेऊन शिक्षण सुरु आहे.

शाळा दुमजली असून पहिल्या मजल्यावर तीन तर दुसऱ्या मजल्यावर दोन वर्गखोल्या आहेत. यामधील दुसऱ्या मजल्यावरील खोल्या जीर्ण अवस्थेत असून मुले खेळताना इमारत कंपन पावते. त्यामुळे ही संपूर्ण इमारत पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी तो प्रत्यक्षात मात्र उतरवलेला नाही. अधिकाऱ्यांकडून केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत असून ही शाळा कोणत्या परिस्थितीत उभी आहे याची कल्पनाही अधिकाऱ्यांना नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

गावांचा समावेश महापालिकेत होण्यापूर्वी सातत्याने ग्रामपंचायतीकडून नव्याने इमारत करण्यासंबंधी आम्ही पाठपुरावा केला जात होता. परंतु, प्रशासनाने याला कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. आता महापालिकेत समावेश झाला असला तरी शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण झाले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था ग्रामस्थांची झाली आहे.

धोकादायक इमारतीत शिक्षण सुरु असल्याने सातवीतील विद्यार्थीनी अक्षरा वाठोरे हिने मुख्याध्यापकांना पत्राद्वारे ती गांधीजयंतीच्या दिवशी ग्रामपंचायतीच्या समोरील चौकात आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले. ही माहिती मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविली असली तरी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे मात्र, याबाबत कोणतीही माहिती नाही.

तपशील

  • शाळेचे बांधकाम - २००५

  • वरील दोन वर्गखोल्याचे काम - २००७

  • एकूण वर्ग खोल्या - ५

  • अतिधोकादायक खोल्या - २

  • शाळेचा एकूण पट - ८७

  • वर्ग - पहिली ते सातवी

  • शिक्षक संख्या - ५

  • सद्स्थिती - अनेक ठिकाणी भिंतीला तडे, जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण

प्रतिक्रिया

ही शाळा महापालिकेच्या हद्दीत असून वरिष्ठांच्या आदेशानुसार तिचे लवकरात लवकर हस्तांतरण करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे ही शाळा महापालिकेकडून दुरस्त करण्यात येईल. तसेच, मुलगी गांधीवादी मार्गाने उपोषण करणार असून तिच्या शंकाचे निरसन आणि समाधान करण्यात येईल. त्याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून तोडगा काढण्यात येईल.

- रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद.

मुलीच्या उपोषणाबाबत कुठल्याही प्रकारची कल्पना नाही, तसे पत्रही मिळालेले नाही. मात्र, इमारत धोकायदायक असल्याची कल्पना असून शाळा ग्रामपंचायतीच्या इमारतीत भरविता येते का याची आमच्याकडून चाचपणी सुरु आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.

- नीलिमा म्हेत्रे, गट शिक्षणधिकारी, हवेली पंचायत समिती

सातवीतील विद्यार्थीनीने शाळेच्या धोकादायक इमारतीबाबत पत्र लिहले आहे. या पत्रात तिने इमारतीच्या दुरुस्तीची मागणी केली असून दखल न घेतल्यास आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे. ही माहिती आम्ही हवेली पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे कळविली आहे.

- गणेश सटाले, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, गुजर-निंबाळकरवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT