Jalparni removal sakal
पुणे

Sakal News Effect : अखेर कालव्यातील जलपर्णी काढण्यास सुरुवात

साडेसतरानळीपासून पुढे वाहणाऱ्या बेबी कालव्यात साठलेल्या जलपर्णीमुळे मोठ्याप्रमाणात डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

कृष्णकांत कोबल

साडेसतरानळीपासून पुढे वाहणाऱ्या बेबी कालव्यात साठलेल्या जलपर्णीमुळे मोठ्याप्रमाणात डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

हडपसर - साडेसतरानळीपासून पुढे वाहणाऱ्या बेबी कालव्यात साठलेल्या जलपर्णीमुळे मोठ्याप्रमाणात डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रार करून ही जलपर्णी काढण्याची मागणी केली होती. सकाळने या वृत्तास प्रसिध्दी दिल्यानंतर जलसंपदा विभागाने तीन दिवसांपासून जेसीबी यंत्राच्या साह्याने जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे.

मुळा-मुठा नदीतील मुंढवा जॅकवेलमधून साडेसतरानळी येथून पुढे जाणाऱ्या बेबी कालव्यात पाणी सोडले जात आहे. या पाण्यातून आलेल्या जलपर्णीची कालव्यात वाढ होऊन संपूर्ण कालवा तीने व्यापून गेला आहे. जलपर्णीखालील पाण्याची दुर्गंधी व जलपर्णीवर होणारी डासांची पैदास यामुळे साडेसतरानळी ते शेवाळेवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याची तक्रार पाटबंधारे विभाग व पालिका प्रशासनाकडे काही कार्यकर्त्यांनी केली होती.

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडेही तक्रार केली होती. जलसंपदा विभागाने ही बाब गांभीर्याने घेत गेली तीन दिवसांपासून सोलापूर रस्ता, पंधरा नंबर परिसरात जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

'कालव्यातील जलपर्णी, दुर्गंधीयुक्त पाणी आणि त्यावरील डासांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या जलसंपदा विभागाकडून ही जलपर्णी काढून कालवा स्वच्छ केला जात आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण व दुर्गंधी काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. पालिकेनेही ही बाब गांभीर्याने घेऊन वेळोवेळी औषध फवारणी करून डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करून नागरिकांचे आरोग्य जपावे.'

- प्रताप पवार, अमरसृष्टी सोसायटी

'बेबी कालव्यातील जलपर्णीमुळे होणाऱ्या त्रासाबाबत शेवाळेवाडी, लक्ष्मीकॉलनी, अमरसृष्टी सोसायटी, इंद्रप्रस्थ सोसायटी, घुलेवस्ती परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार यंत्रसामुग्री उपलब्ध करून तीन दिवसांपासून जलपर्णी काढण्याच्या कामास सुरुवात केली आहे. सात-आठ दिवसात हे काम पूर्ण केले जाईल.'

- सुभाष शिंदे, सहाय्यक अभियंता २, जलसंपदा विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT