हडपसर : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी हडपसर उपनगर सज्ज झाले आहे. पालिका व पोलीस प्रशासनाकडून पुणे-सोलापूर व पुणे-सासवड मार्गावर विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय विविध संस्था, मंडळे व राजकीय पक्षांकडून देण्यात येणाऱ्या सेवांचीही लगबग सुरू झाली आहे.
शहरातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर हडपसर येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोलापूर महामार्गाने तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतो. दोन्हीही पालखी सोहळ्याला एकाच ठिकाणाहून निरोप देण्यासाठी शहरासह परिसरातील भाविक हडपसर परिसरात मोठ्या संख्येने येत असतात. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसह निरोप देण्यासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा व सुरक्षा देण्यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासन व संस्था संघटना व मंडळांकडून येथे जोरदार तयारी केली जात आहे.
पालिकेकडून येथील विसावा स्थळांची डागडुजी, रंगरंगोटी, दिवाबत्ती व सुशोभीकरण करण्यात येत आहे. वारकऱ्यांसाठी पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्यसुविधा, मार्गांची डागडुजी व स्वच्छता करण्यात आली आहे. पोलिसांनीही मार्गाची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेची तयारी केली आहे. विविध मंडळे, संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्या वतीने अन्नदान, गरजेच्या वस्तू, आरोग्य सुविधा व स्वागतासाठी व्यासपीठे, मंडप उभारणीचे काम सुरू केले आहे.
"महानगर पालिकेकडून दोन्हीही पालखी मार्गांची स्वच्छता करण्यात आली आहे. अतिक्रमणे हटवली आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पावडर फवारणी केली आहे. भटकी जनावरे उचलण्यात आली आहेत. विसावा स्थळांची रंगरंगोटी व दिवाबत्ती करण्यात आली आहे. अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या काढण्यात आलेल्या आहेत. ठिकठिकाणी पाण्याची, आरोग्य सुविधांची, फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. रस्त्यावरील खड्डे, साईडपट्ट्या भरून घेतलेल्या आहेत.'
प्रसाद काटकर सहाय्यक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय
"भैरोबानाला ते मगरपट्टा पालखी सोहळा मार्गावर रस्ते दुरूस्ती, रंगरंगोटी केली आहे. मार्गावरील दोश शाळांमध्ये वारकऱ्यांसाठी प्राथमिक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या काढण्यात आलेल्या आहेत. ठिकठिकाणी स्वच्छता कर्मचारी नेमले आहेत.'
श्याम तारू सहाय्यक आयुक्त, वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय
हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाची व्यवस्था
विविध विभागाचे अधिकारी - ४५
स्वच्छता कर्मचारी - ८५०
फिरती स्वच्छतागृहे - २२९
निर्माल्य कलश - २७
पाणी टँकर ठिकाणे - १३
नळकोंडाळे - ५
"शहर पोलीस हद्दवाढीमुळे पालखीसाठीचा पोलीस बंदोबस्त भैरोबानाल्यापासून सोलापूर महामार्गावरील ऊरूळीकांचन येथील खेडेकर मळ्यापर्यंत तर सासवड मार्गाने दिवेघाटापर्यंत राहणार आहे. दोन दिवस हा बंदोबस्त राहणार असून तो रात्री व दिवसा वेगवेगळा असेल. त्यामध्ये पालखीभोवती सुरक्षा कडे, विसाव्याच्या ठिकाणी स्री-पूरूषांसाठी दर्शन रांग वेगवेगळी असेल. पेट्रोलिंगसह दिंड्यांसाठी वेगळी सुरक्षा व्यवस्था केली आहे. राखीव पोलीस दल, स्वयंसेवक, त्या-त्या भागातील प्रशासन, संस्था, मंडळे यांचेही सहकार्य घेण्यात आले आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी झालेली आहे.'
असा असणार पोलीस बंदोबस्त
पोलीस उपायुक्त - ४
सहाय्यक पोलीस आयुक्त - ६
पोलीस निरिक्षक - २९
पोलीस उप निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक - १०३
पोलीस कर्मचारी - १०१०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.