Home-Generation-Society Sakal
पुणे

सोसायट्यांमध्ये देखभाल शुल्क न भरणाऱ्यांमुळे प्रामाणिक सभासदांना त्रास

गृहनिर्माण सोसायट्यांमधील काही सभासद देखभाल शुल्क (मेंटेनन्स) नियमित भरत नाहीत. त्यामुळे काही सोसायट्यांमध्ये सभासदांना समस्यांना सामोरे जावे लागते.

सकाळ वृत्तसेवा

गृहनिर्माण सोसायट्यांमधील काही सभासद देखभाल शुल्क (मेंटेनन्स) नियमित भरत नाहीत. त्यामुळे काही सोसायट्यांमध्ये सभासदांना समस्यांना सामोरे जावे लागते.

पुणे - गृहनिर्माण सोसायट्यांमधील (Society) काही सभासद देखभाल शुल्क (मेंटेनन्स) (Maintenance) नियमित भरत नाहीत. त्यामुळे काही सोसायट्यांमध्ये सभासदांना समस्यांना (Problem) सामोरे जावे लागते. पदाधिकाऱ्यांनाही कामकाज करणे अवघड होते. परंतु, नियमित मेंटेनन्स भरणाऱ्या सोसायट्यांमधील सभासदांना आवश्यक सुविधा (Required Facilities) मिळत आहेत. ‘सकाळ’ने (Sakal) सोसायट्यांमध्ये प्रकर्षाने जाणवणाऱ्या या मुद्यावर प्रकाशझोत टाकला. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी त्यावर आपली मते मांडली. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया....

ज्ञानेश्‍वर हेडाऊ, हडपसर - काही बेजबाबदार सभासद मासिक देखभाल शुल्क वेळेवर भरत नाहीत. त्यामुळे सोसायटीचे आर्थिक गणित कोलमडते, हे सत्य आहे. विजेचे बिल, सुरक्षारक्षक, लिफ्ट दुरुस्तीसह इतर कामांवर महिन्याला खर्च होतो. बरेच सभासद वेळेवर आणि आगाऊ वर्गणी भरतात. परंतु, पाच-दहा टक्के सभासदांना वाटते की, मासिक शुल्क नाही दिले तरी चालते. नेहमीच कायद्याचा बडगा दाखविण्यापेक्षा सामोपचाराने तोडगा काढला पाहिजे. प्रसंगी त्यांच्याकडे जबाबदारी सोपवावी.

सुनील शिंदे, चेअरमन, वेरोनिका पार्क हाउसिंग सोसायटी, आंबेगाव बुद्रूक - आमच्या सोसायटीमध्ये मासिक देखभाल शुल्क दर महिन्याला १८०० रुपये आहे. पण, थकीत रक्कम ही साडेपाच लाख रुपये एवढी आहे. सोसायटीला पूर्ण पाणी टँकरने विकत घ्यावे लागते. त्यामुळे कामकाज चालवणे अवघड होते.

हेमंत मुळे, पीएस टॉवर, मगरपट्टा - सामान्य नागरिक मेंटेनन्स भरतात. परंतु, काही राजकीय पुढारी अहंकारामुळे भरत नाहीत. वसुलीसाठी वाईटपणा घ्यावा लागतो. सभासद करून घेताना मेंटेनन्स न भरल्यास त्यांच्या बँक खात्यातून तो खर्च सोसायटीकडे वर्ग करण्याचे प्रतिज्ञापत्र बंधनकारक करावे. त्यामुळे फरक पडू शकतो.

संजूदा कॉम्प्लेक्स, भेकराईनगर, फुरसुंगी - काही सभासदांकडे एक ते दीड वर्षांचा मेंटेनन्स थकीत आहे. मेंटेनन्स न भरणारे मजेत सगळ्या सुविधांचा वापर करीत आहेत. पण, नियमित मेंटेनन्स भरणाऱ्या सभासदांवर अन्याय होतो. पाण्याचे बिल, वीजबिल सगळ्या गोष्टी थकल्या आहेत. या कारणामुळे सोसायटीचा चेअरमन होण्यासाठी कोणी पुढे येत नाही.

मंगेश लडकत, सदस्य, कृष्णाज ब्लेसिंग सोसायटी, मांजरी बुद्रूक - आमची दोनशे सदनिकांची सोसायटी आहे. सर्व सभासदांनी ठरवले पाहिजे की आपली सोसायटी हे आपले कुटुंब आहे. आमच्या येथे ९० टक्के सभासद वेळेवर मेंटेनन्स देतात. त्यामुळे सोसायटीचे काम उत्तम चालते.

राजन बिचे, सहसचिव, पूनम गार्डन सोसायटी, बिबवेवाडी - आमच्या सोसायटीला सातत्याने ऑडिटचा ‘अ’ वर्ग मिळत आहे. याचे कारण शिस्तबद्ध आर्थिक नियोजन. एखाद-दुसरा अपवाद आहे. पैशांचे योग्य नियोजन करून खर्चाचे नियोजन केले जाते. सोसायटीची आर्थिक परिस्थिती त्यामुळेच उत्तम आहे. याचे श्रेय सर्व संचालक मंडळ आणि सदनिकाधारकांना जाते.

गिरीश गुजर, रिव्हर व्ह्यूव सोसायटी, शिवणे - आमच्या सोसायटीत काहींनी फक्त गुंतवणूक म्हणून फ्लॅट घेतले असून, ते मेंटेनन्स भरत नाहीत. बिल्डरचे काही फ्लॅट बंद असून, मेंटेनन्स भरत नाहीत. अशा थकबाकीदारांमुळे सोसायटीचे कामकाज चालवणे कठीण जात आहे. प्रामाणिक सभासद वेळेवर शुल्क भरतात. त्यांच्यावरच नेहमी अन्याय होतो.

दंड आकारतो

आम्ही मेंटेनन्स आकारताना दहा टक्के अतिरिक्त भार ठेवून गणित मांडले आहे. थकबाकीदारांकडून २२ टक्के दंड आकारला जातो. आमची थकबाकी शून्य असते. संबंध नीट ठेवले आणि कायदा निःपक्षपातीपणे सांभाळला, तर लोक थकबाकीदार होत नाहीत, असे पिंपरीतील अनुग्रह सोसायटीतील सभासद यशवंत आपटे म्हणाले.

कायदेशीर प्रक्रिया

प्रत्येक सोसायटीने थकबाकी वसुलीची कायदेशीर प्रक्रिया अमलात आणली, तरच कारभार सुरळीत चालेल. अन्यथा कालांतराने सोसायटीची अवस्था मोडकळीस येईल, असे नारायण पेठेतील हरीश कावतकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT