Hawkers Sakal
पुणे

Hawkers : पथारी व्यावसायिकांची थकबाकी ५४ कोटीच्या वर

शहरातील पथारी, हातगाडी, लहान स्टॉलधारक आणि मोठ्या स्टॉलधारकांना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून परवाना दिला जातो.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील सुमारे आठ हजार पथारी व्यावसायिक, स्टॉलधारक, टपरीधारकांकडे २०१७ पासूनची ५४ कोटी रुपयांची थकबाकी निर्माण झाली आहे. ३१ मार्च अखेर ही थकबाकी वसूल करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. थकबाकी न भरणाऱ्या पथारी व्यावसायिकांची जागा सील करून साहित्य जप्त केले जाणार आहे.

शहरातील पथारी, हातगाडी, लहान स्टॉलधारक आणि मोठ्या स्टॉलधारकांना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून परवाना दिला जातो. या व्यवसायिकांना परिसर आणि स्टॉलच्या आकारानुसार भाडे आकारले जाते. तसेच शहरातील हजारो पथारी व खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या व्यवसायिकांचे झोन तयार आहे. झोन नुसार त्यांना दैनंदिन शुल्क ५० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत आहे.

महापालिकेकडून व्यवसायिकांना आकारण्यात आलेले भाडे वेळच्या वेळी महापालिकेला जमा करणे बंधनकारक असताना अनेक व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. शहरातील सुमारे ८ हजार पथारी व्यावसायिक असून त्यांच्याकडे एकूण ५४ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

१७ महिन्याचे भाडे माफ

५४ कोटी रुपयांची थकबाकी २०१७ पासूनची असली तरी कोरोनाच्या काळातील १७ महिन्यांचे भाडे महापालिकेने माफ केले आहे. त्यानंतरही अनेक व्यावसायिकांनी दैनंदिन शुल्क भरण्याकडे पाठ फिरवली आहे. अतिक्रमण विभागाने भाडे किंवा थकबाकी भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरीही त्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे.

‘पथारी व्यावसायिक, स्टॉल धारकांनी महापालिकेने निश्‍चित केलेले शुल्क नियमीत भरणे आवश्‍यक आहे. पण २०१७ पासून सुमारे आठ हजार स्टॉलधारकांनी ५४ कोटींचे शुल्क थकविले आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. वीस दिवसांत भाडे, थकबाकी भरण्याच्या नोटिसा दिल्या जाणार आहेत. त्यानंतर पैसे भरले नाहीत तर टपरी, स्टॉल सील करणे, साहित्य जप्त केले जाईल.’

- माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT