खडकवासला : सिंहगड पायथा येथील डोणजे- गोळेवाडी येथील वन विभागाच्या उपद्रव शुल्क नाक्यावर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दोन तीन पोलिस वाहन आली. वाहने नाक्याच्या पुढे जाऊन थांबली. त्या पोलिस वाहनातून रुबाबदार व्यक्ती उतरली. त्यांच्या पिळदार मिशा होत्या. फिकट गुलाबी रंगाचे बूट, काळ्या रंगांची ट्रेक पॅन्ट, पिवळ्या रंगाचे जॅकेट घातले होते व डोक्यावर टोपी होती. अशी व्यक्ती वाहनातून उतरताच गडाख्या दिशेने पायी चालू लागली. ती व्यक्ती होती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे नेहमी फिटनेससाठी जागृत असतात. आज बुधवारी भर दुपारी त्यांनी सिंहगड घाटातील सोळा किलोमीटरची पायपीट करीत फिटनेस जपले. तरुणांच्या मध्ये त्यांच्या फिटनेसची चर्चा होती. यामुळे गडावर विजय व अमित मुजुमले यासह अनेकांनी त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती.
भर दुपारी त्यांनी सिंहगडाचा घाट रस्त्याने पायी चालू लागले. त्यावेळेस त्यांच्या सोबत इतर पोलीस कर्मचारी सोबत चालत होते. घाट घाटातील कोंढणपूर फाटा सुमारे दीड वाजता त्यांनी क्रॉस करून ते गडाच्या दिशेने चालत गेले. त्यानंतर पुन्हा दीड तासाने ते गडावरून खाली उतरले. ते परतगोळेवाडी येथे चार वाजण्याच्या सुमारास पोहोचले. त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्तांचे चालतानाचे छायाचित्र देऊ नका. अशा सूचना वन संरक्षण समितीच्या सुरक्षारक्षक व नागरिकांना दिल्या त्यांनी आज सिंहगड घाट सुमारे आठ किलोमीटरचा चढ- उतार आठ किलोमीटरचा असा सोळा किलोमीटरचा व्यायाम करीत फिटनेस फंडा जोपासला.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी यापूर्वी विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन पदक पटकावले आहेत तसेच फिटनेस मधील फायरमॅन हा किताब देखील त्यांनी फटकविला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.