mud on sp ground sakal
पुणे

Pune Rain : नरेंद्र मोदींच्या सभेच्या ठिकाणी झाले चिखलाचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यांची पुण्यात उद्या (ता.२६) सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. पण आज (ता. २५) दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चिखल कमी करण्यासाठी मुरूम, खडी टाकली जात असली तरी हे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली आहे.

जिल्हा न्यायालये ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे उद्‍घाटन आणि यासह अन्य प्रकल्पांच्या भुमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी गुरुवारी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांची स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून या मैदानावर व्यासपीठ उभारणे, नागरिकांची बैठक व्यवस्था करणे याची तयारी सुरु आहे.

मंगळवारी (ता. २४) शहरात जोरदार पाऊस पडला, त्यामुळे मैदानावर चिखल झाल्याने प्रशासनाने पाणी वाहून जाण्यासाठी चर खोदणे, पाईप टाकून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करणे अशी कामे केली. मैदानात व नागरिकांसाठी तयार केलेल्या रस्त्यावर चिखल झाला आहे. तेथे खडीचा बारीक चुरा व मुरूम टाकला जात आहे.

पण आज दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे सभेच्या ठिकाणी दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी घोट्याच्या वर पाणी जमा जमा झाले. मोठ्या प्रमाणात चिखलही झाला आहे. महापालिका व जिल्हा प्रशासनातर्फे चिखल कमी करण्यासाठी उपाय योजना सुरु असल्या तरी पूर्णपणे मैदान कोरडे करणे अशक्य आहे.

Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग! सर्वाधिक पावसाची नोंद, जाणून घ्या कोणत्या परिसरात किती कोसळला?

Pune Rain: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर

Rain News: धो धो पावसामुळे टॅक्सीवाले मालामाल; अतिरिक्त भाडे आकारत चाकरमान्यांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Mumbai Rain: मुंबईत परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली

Changes in Transportation : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त असे असतील शहरातील वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT