SYSTEM
पुणे

पुणे जिल्ह्यात पावासाचा धुमाकूळ; कुठे, काय परिस्थिती?

pune

पुणे : गेल्या दोन- तीन दिवसांपासून शहरात पावसाचा जोर वाढत आहे. गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी झाडपडीच्या सात घटना घडल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी रस्त्यांवर पडलेल्या फांद्या व झाडांना हटवून वाहतुकीसाठीचा मार्ग मोकळा केला.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या घटना

भोर तालुक्यात पावसाचे थैमान; भातशेतीला फटका

भोर तालुक्याच्या हिर्डोशी खोरे, आंबवडे खोरे, वीसगाव खोरे आणि नीरा-देवघर धरण खोऱ्यातील गावांमध्ये बुधवारी (ता.२१) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मालमत्तेचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर आंबवडे येथील मोहन अमृता घोरपडे (वय २७) यांचा बुधवारी (ता.२१) रात्री विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. मुसळधार पावसाने शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे शेतांचे बांध, मोठमोठ्या दगडांच्या ताली फुटल्या, काही ठिकाणी दरडी कोसळल्याने आणि डोंगरांतील माती वाहून आल्याने शेती गायब झाली. काही ठिकाणी भातशेती वाहून गेली. तर काही ठिकाणी शेतात पाणीच पाणी झाले आहे.

भोरमधील नीरा नदीला पूर

भोर : तालुक्यात बुधवारी (ता.२१) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नीरा नदीला पूर आला आहे. भोर शहर-भोलावडे मार्गावरील छोटा पूल पाण्याखाली गेला तर नदीकिनारी असलेल्या शहरातील पद्मावती वस्तीला जाणाऱ्या रस्त्यापर्यंत पाणी पोचले आहे.

भोर

- महाड मार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळली

- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने काम सुरु

आंबेगाव

- मौजे कोलतावडे येथे गावाच्या रस्त्यावर दरड कोसळून मुख्य रस्ता बंद झाला होता. मात्र आता तो सुरु करण्यात आला

- अतिवृष्टीमुळे काही गावांमध्ये नैसर्गिक ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर. त्यामुळे लगतच्या शेतजमिनीच्या बांधांचे नुकसान

- काही ठिकाणी ओढ्यावरील पुलांचे नुकसान

आंबेगाव तालुक्यात सत्तर टक्के भात शेती गेली वाहून

डिंभे, गोहे, मापोली परिसरात ढगफुटी; २४ तासांत ३०० एकरचे नुकसान

आंबेगाव तालुक्यातील डिंभे खुर्द, डिंभे बुद्रक, गोहे बुद्रुक, मापोली परिसरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ७० टक्के भात शेती वाहून गेली आहे. येथे रात्री ढगफुटी झाल्याचे डिंभे बुद्रुकचे सरपंच प्रदीप आमोंडकर यांनी सांगितले. येथील ३०० एकरहून अधिक भात शेतीचे पूर्ण नुकसान झाले आहे.

घोडनदी व बुब्रा नदीला पूर

घोडनदी व बुब्रा नदीला पुर आला असून डिंभे धरणात वेगाने पाणी वाढत आहे. पोखरी येथील पाझर तलाव भरून वाहू लागला आहे. प्रसिद्ध असा कोंढवळ धबधबा वाहू लागला आहे. पोखरी घाटात उन्हाळ्यात संरक्षण भिंत व गटाराचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले. परंतु वरील बाजूचे माती व दगडी पडून रस्ता बंद झाला आहे. हा रस्ता दुपारी १२ वाजता एकरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आहुपेला जाणारा रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. डिंभे धरणाकडे जाणाऱ्या छोटा पूल पाण्यामुळे खचला आहे.

पवना, मुळा, इंद्रायणीला पूर

नदीलगतच्या वस्त्यांपर्यंत पाणी; खोदकामाच्या ठिकाणी चिखल

गेल्या दोन दिवसांपासून मावळ व मुळशी तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीला पूर आला आहे. नदी लगतच्या वस्त्या व नागरी भागापर्यंत पाणी पोहचले आहे. दरम्यान, शहर परिसरातही आषाढाच्या सरींवर सरी बरसत असून रस्त्यांवर पाणी साचले आहे. विविध सेवा वाहिन्यांसाठी केलेल्या खोदकामाच्या ठिकाणी चिखल झाला आहे.

पवना धरण ६० टक्के भरले

चोवीस तासांत ३३२ पावसाची नोंद; बारा टक्क्यांनी पातळी वाढली

मावळ तालुक्यासह पिंपरी-चिचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना साठ टक्के भरले. त्यामुळे पिंपरी-चिचंवडकरांचा पाणी कपातीचा प्रश्न मिटला असल्याची माहिती शाखा अभियंता अन्वर तांबोळी यांनी दिली.

मावळ

- आपटी गेव्हंडे येथे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात माती आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद

- मौजे धामणे येथील पुलावरून पाणी जात असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद

- मळवली स्टेशनजवळील ओशो आश्रमात पाणी गेल्याने त्या ठिकाणी अडकलेल्या लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली

- आजिवली भागात पुराच्या पाण्याने भातशेतीचे नुकसान

- पिंपरी येथील पूल व रस्त्याचे नुकसान

- वाडीवळे व नाणे पूल वाहतुकीसाठी बंद

कुकडी’च्या साठ्यात १३ टक्के वाढ

कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मागील बारा तासात कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात सुमारे तीन टीएमसीने वाढ झाली आहे

गुंजवणी धरण निम्मे भरले

वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरण क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासांत २२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गुंजवणी धरण ५० टक्क्यांहून अधिक भरल्याची माहिती गुंजवणी धरणाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी दिली.

आढले, पुसाणे ओव्हरफ्लो; कासारसाईतून विसर्ग सुरू

संततधार पावसामुळे आढले, पुसाणे धरण ओव्हरफ्लो झाले असून कासारसाईतून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. तसेच, साळुंब्रे व सांगवडे पुलावर पाणी आले आहे.

कळमोडी धरण ओव्हरफ्लो

आरळा नदीपात्रात सांडव्यावरून ३००० क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग

चास, ता.२२ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील आरळा नदीवरील कळमोडी धरण शंभर टक्के भरले आहे. सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग आरळा नदीपात्रात होत असल्याची माहिती सहाय्यक अभियंता पी. बी. शिंदे यांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे मागील वर्षी धरण ११ ऑगष्ट रोजी शंभर टक्के भरले होते. मात्र, चालु वर्षी २२ जुलैला धरण ओव्हरफ्लो झाले. धरणाच्या सांडव्यावरून ३००० क्यूसेस वेगाने पाणी आरळा नदीपात्रात विसर्ग होत आहे.

ढगफुटीसदृश पावसाने मावळात हाहाकार

तालुक्यातील जनजीवन विस्कळित; सर्व नद्यांना पूर, अनेक पूल पाण्याखाली

मावळ तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने ओढे व नद्यानाल्यांना पूर आला आहे. पवना व इंद्रायणी नदीवरील अनेक पुलांवरून पाणी जाऊन गावांचा संपर्क तुटला आहे. काही सखल भागात दूरपर्यंत पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी आसरा घेण्याची वेळ आली आहे. काही घरे, गोठे, दुकाने, शाळा व शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. धरणांच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ होत असल्याने पाणी निसर्गाची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

ढगफुटीसदृश्य पावसाने शेतकरी उद्ध्वस्त

खेड पश्र्चिम पट्ट्यात घरात शिरले पाणी; पिके गाडली तर बांध, बंधारे फुटले

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात बुधवारी (ता. २१) रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. खरिपाची पिके वाहून गेली तर काही गाडली गेली. मुसळधार पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले. पूल वाहून गेला, बंधारे-बांध फुटून वाहून गेले. यासह पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अधिकच कोरोनामुळे पिचेला शेतकरी पुरता उद्‌वस्त झाला आहे. यामुळे नुकसान भरपाईसाठी पंचनामे करण्याची मागणी होत केली आहे.

खेड

- कळमोडी धरण १०० टक्के भरले असून, आरळा नदीत ३ क्यूसेस पाण्याचा विसर्ग

- नदीकाठच्या भागातील नागरिकांना इशारा

- नायफड येथील मातीचा कच्चा बंधारा फुटल्याने जवळच्या भातशेतीचे नुकसान

भामा आसखेडचा पाणीसाठा साठीपार

आंबेठाण, :खेड तालुक्यासह शिरूर आणि दौंड तालुक्याला वरदानठरणाऱ्या भामा आसखेड धरणात सध्या ६२.१४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरले होते. गेल्या वर्षी आजच्या तारखेला धरणात ४१.६० टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT